‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाणार आज पहिला वाइल्ड कार्ड संग्राम चौगुले; घरात जाताच अरबाजला दिली फुल ऑन धमकी
Bigg Boss Marathi Day 44 : बिग बॉस मराठीचा या आठवड्याचा गणपती स्पेशल भाऊचा धक्का चांगलाच गाजला. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून घन:श्याम दरवडेने निरोप घेतला. अशातच याच आठवड्यात बिग बॉस मराठीमध्ये या सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्रीदेखील झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाणार आज पहिला वाइल्ड कार्ड संग्राम चौगुलेची एन्ट्री होणार आहे. संग्राम कसा खेळ खेळणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये संग्राम आपल्या नावाची पाटी घेत घरात एन्ट्री करताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत संग्रामने घरात एन्ट्री घेतली आहे. घरात येताच संग्रामने अरबाजने फुल ऑन धमकी दिली आहे. आतापर्यंत तू जी पॉवर दाखवलीस ती वीक माणसाला दाखवली आहेस, असं घरात येताच संग्राम अरबाजला म्हणाला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये झाली सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणजेच संग्राम चौगुले. आता नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील ? नात्यांमध्ये काय बदल होतील ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल ? म्हणजेच येणारा आठवडा खूप आव्हाात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.
कोण आहे संग्राम चौगुले?
बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. त्याने दीड मिलियन फॉलोअर्स आहेत. फिटनेसवर त्याने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आजवर त्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्याने सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राच्या किताबावर आपले नाव कोरले आहे. त्याची स्वत:ची एक आलिशान जीमदेखील आहे.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
