Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मोर्शी विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विश्वासाल तडा जाऊ देणार नाही – अजित पवार

अमरावती  : अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री अजित पवार यांनी हजारो महिला भगिनी आणि युवक बांधवांशी मनमोकळा संवाद साधला.
वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही निवडून दिलंत. आमदार देवेंद्र भुयार हे कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आहेत. म्हणूनच या मतदारसंघातील विकास कामांकरता जास्तीतजास्त निधी उपलब्ध करून देता आला. मी सुद्धा शेतकरी कुटुंबातच जन्माला आलो आहे. मला ही शेतीविषयक सगळी जाण आहे. संत्रा नगरी अशी नागपूरची ओळख आहे. आपल्या नागपुरात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याकरता आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा मालाला चांगला भाव मिळेल. वरुड मोर्शी तालुक्याच्या वैभवात भर पडेल. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, हीच महायुतीची भूमिका असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
आज कित्येक लोकांना शेतीमधलं काही माहिती नाही आणि ते शेतकर्‍यांच्या बाता मारताय. मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय, त्यामुळे मला शेतकर्‍यांच्या वेदना माहित आहेत. सगळे सोंग करता येतात. मात्र, पैशाचे सोंग करता येत नाही. आपण सरकारमध्ये असल्याने आपण हे प्रत्यक्ष पैसे देऊन दाखवून दिलेले आहे. महिला व बाल रुग्णालयासाठी बारा कोटी रुपयांची सहा एकर जमीन दान देणाऱ्या विजय वडास्कार यांचे मी अभिनंदन केले. मी तुमच्या मतदारसंघात 4000 कोटीचा निधी दिलाय. त्यामुळे पुन्हा देवेंद्र भुयार यांना संधी द्या. वरुड मोर्शी मतदारसंघात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, हा अजित पवारांचा शब्द असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जन सन्मान यात्रेला संबोधित करतांना केले.
मी ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं माझं धोरण नाही, मी काय सांधु संत नाही, हाडामासाचा माणूस आहे. आता मेहरबानी करा, सगळीकडे देशात विकासाचे काम सुरू आहेत, सोयाबीनला, कापसाला भाव चांगला द्यायचा आहे. त्यामुळे पुन्हा महायुतीचं सरकार निवडूण आणा, सरकारने घोषणा केलेल्या सगळ्या भावंडाच्या, माय माऊलीच्या, बहिणींच्या योजना चालू राहील असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्शी वरूड तालुक्यातील हजारो नागरिकांना आवाहन केलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत घटना बदलणार, संविधान बदलणार, असा अपप्रचार करण्यात आला. त्याला मागासवर्गीय अल्पसंख्यांक समाज बळी पडला. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्रात मुली आत्महत्या करत असेल तर या अर्थमंत्री पदाला काय चाटायचे आहे. सत्ता येत राहील, जाता राहील. माणूस जगला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे. म्हणून सर्व मुलींची फीस भरण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.आम्ही केवळ लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही तर, ज्या गरीब मुली शिकू शकत नाही, त्यांनी 50% शुल्क भरू शकत नसल्याने काही मुलींनी आत्महत्या केलीय आणि विरोधक ओरडतात की सरकारने नको त्या योजना आणल्या. 44 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इथूनपुढे शेतकऱ्यांना कृषी पंपाचे बिल भरावे लागणार नाही. मागच्या वीज बिलाची चिंता करू नका, ते वीज बिल माझ्यावर सोडून द्या. असे आश्वासन देत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मोर्शी विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विश्वासाल तडा जाऊ देणार नाही – अजित पवार
मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघात देवेंद्र भुयार च्या रूपाने असा का लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला की मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तो दिवस रात्र त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत असतो आणि गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी 4 हजार 372 कोटी रुपयांचे विकास कामे ही मंत्रालयातून शासनाकडून खेचून आणण्याचे काम केलं एकटा गडी निवडून आला परंतु आज 4 हजार 372 कोटी रुपये मतदार संघाच्या विकासा करीता घेऊन गेला. देवेंद्र भुयार यांना विकासकामांसाठी निधी खेचून आणण्याचा पाठपुरावा करण्याचा चांगला अनुभव असल्यामुळे उद्याच्याला लक्ष ठेवा बघता बघता विधानसभेच्या निवडणुका येतील त्यामध्ये पुढेही आमदार देवेंद्र भुयार याला संधी द्या मोर्शी विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोर्शी वरूड तालुक्यातील जनतेला केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading