Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू-वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला प्रवास संपला

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात ‘कोकण हार्टेड गर्ल’ सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आहे. पण अंकिता प्रभू-वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास आता संपला आहे. बिग बॉस मराठीच्या घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळाला. पण अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे,”या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता”. त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत.

‘बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडली आहे. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading