ईकोस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 28 ऑगस्ट 2024 पासून सुरू
- प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 318 रुपये ते 334 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
- बोली/ऑफर बुधवार 28 ऑगस्ट 2024 रोजी खुली होईल आणि शुक्रवार 30 ऑगस्ट 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार 27 ऑगस्ट 2024 असणार आहे.
- बोली किमान 44 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 44 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
- इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 159 पट फ्लोअर किंमत आहे आणि कॅप प्राइस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 167 पट आहे.
- RHPलिंक: https://www.iiflcap.com/Upload/InvestmentBanking/Prospects/ECOS_India_Mobility_and_Hospitality_Ltd_-RHP.pdf
ईकोस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेड (“ECOS” किंवा “द कंपनी”) इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 28 ऑगस्ट 2024 पासून सुरू करत आहे. इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफर साइजमध्ये (प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य) 18,000,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. (“एकूण ऑफर साइज”).
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 असणार आहे. बीड ऑफर शुक्रवार 30 ऑगस्ट 2024 रोजी बंद होईल. (“बीड डिटेल्स”).
प्रति इक्विटी शेअरसाठी 318 रुपये ते 334 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. (“द प्राइस बॅन्ड”).
बोली किमान 44 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 44 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“बीड लॉट”).
18,000,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलमध्ये राजेश लुम्बा यांच्यातर्फे 9,900,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि आदित्य लुम्बा यांच्यातर्फे 8,100,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) समाविष्ट आहेत. (“विक्री समभागधारक”).
कंपनीच्या 20 ऑगस्ट 2024 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, नॅशनल कॅपिटल टेरीटरी ऑफ दिल्ली अँड हरयाणा, नवी दिल्ली (“ROC”) येथे फाइल करण्यात आले आहेत.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, BSE सह एकत्रितपणे “स्टॉक एक्सेंज”)वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफरसाठी NSE हे नियुक्त केलेले स्टॉक एक्स्चेंज असणार आहे.
इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (“BRLMs”).
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जाहीर करण्यात आली असून, त्या अंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्त्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किमतीइतक्या किंवा अधिक किमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”).
ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल, परंतु म्युचुअल फंडांकडून असलेली एकूण मागणी QIB च्या एकूण हिश्शाच्या 5% पेक्षा कमी असेल, तर वाटपासाठीचे शिल्लक इक्विटी शेअर्स QIB च्या गुणोत्तरीय वाटपासाठी उर्वरित QIB भागात जमा केले जातील.
त्याचप्रमाणे, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु.पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात, त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राइब नसलेला भाग दुसऱ्या इतर उपश्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रियेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशिलासाठी 315 पानावरील “ऑफर प्रोस्युजर” बघा.
इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (“BRLMs”).
येथे वापरल्या गेलेल्या, परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइझ संज्ञांचा समान अर्थ RHP मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणेच असेल.
