Friday, September 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडी कडे माझा लाडका मुलगा आणि माझी लाडकी मुलगी, या दोनच योजना – देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाविकास आघाडी महायुती सरकारच्या लाडकी बहिणी योजनेवर सातत्याने टीका करीत असताना त्यांच्या घटक पक्षांकडे मात्र, माझा लाडका मुलगा आणि माझी लाडकी मुलगी, या दोनच योजना असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लाडक्या बहिणींचा देवा भाऊ’ या कार्यक्रमात फडणवीस यांनी राज्यभरातील भगिनींशी संवाद साधला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. 

आम्ही अमलात आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी सातत्याने आग पाखर केली. लाडका भाऊ योजना आणणार का, असा सवाल करत त्याचा उपहासही केला. आम्ही लाडका भाऊ योजना अमलात आणून तरुणांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी पावले उचलली, असा दावा करून फडणवीस यांनी आपला मोर्चा विरोधकांकडे वळवला. 

काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान झाला तरी माझा मुलगा, मुख्यमंत्री झाला तरी माझा मुलगा किंवा माझी मुलगी, एवढ्याच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या योजना आहेत. त्यांचे राजकारण आपल्या परिवाराकडून ते मर्यादित आहे. सर्वसामान्य जनतेशी त्यांचे काहीही देणे घेणे नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading