निक्की आणि अरबाज मध्ये कोणामुळे उडतायेत खटके? जाणून घ्या…
Bigg Boss Marathi New Season Day 19 : ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात प्रेक्षकांना जान्हवीमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये खटके उडताना दिसणार आहेत. घरातील हा दंगा पाहताना प्रेक्षकांना मात्र मजा येईल. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
प्रोमोमध्ये निक्की अरबाजला हात जोडून विनंती करत म्हणतेय,”अरबाज घराकडे जा…माझ्याकडे येऊ नको”. पुढे अरबाज निक्कीला म्हणतो,”तुझ्यासोबत जसं मी वागतो तसचं आता मी त्याच्यासोबत वागणार”. त्यानंतर निक्की घन:श्याम आणि वैभवला म्हणते,”अरबाज ‘त्या’ मुलीकडे कसा जाऊ शकतो? ज्या मुलीच्या विरोधात मी गेले होते. त्याला ट्रॉफी द्या नाहीतर वेड लागेल त्याला”.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता वादाचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे सगळे सदस्य आता आपल्या मुद्द्यासाठी भांडत आहेत. सदस्यांचे खरे रंग आता प्रेक्षकांना दिसायला लागले आहेत.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
