Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

.. अन्यथा आरएसएसच्या मुख्यालया बाहेर आंदोलन करू – हेमंत पाटील

 

पुणे : भ्रष्टाचार हा भारताचा आंतष्ठता  शत्रू आहे. त्याला मुळापासून फेकून द्यावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.   

हेमंत पाटील म्हणाले, भारतामध्ये भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. शिवाय भ्रष्टाचार वाढत असताना सुद्धा केंद्र सरकार किंवा राज्यातील राज्य सरकार यावर काहीच करत नाही. ही वस्तूस्थिती आहे. मुळात हा भ्रष्टाचार खासदार, आमदार, नगरसेवक अशा लोकप्रतिनिधीं पासूनच सुरू होतो. वास्तविक या लोकप्रतिनिधींनी भ्रष्ट्राचाराला मूळापासून फेकून दिला पाहिजे. असे झाल्यास भारत देश एक विकसीत राष्ट्र होवून भारत देशातील एक नंबरचा देश असेल.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी केली, डिजिटल बँकिंग मोठ्या प्रमाणात सुरू केले. मात्र आज ही असंख्य भारतीयांकडे काळा पैसा आहे. अनेकांचे स्वीस बँकेत खाती आहेत. तो पैसा बाहेर आणण्यासाठी पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी काय करतात हे पहावे लागेल. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने किंवा राष्ट्रीय स्वयंमसेवक  संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या भ्रष्टाचाराला आळा घालावा.  अन्यथा इंडिया अगेन्स्ट करप्शनच्यावतीने आम्ही नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालय बाहेर आंदोलन करू, असा इशारा हेमंत पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading