Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

अल्पसंख्याक समाजाला येत्या विधानसभेत प्रतिनिधित्व मिळणार – इक्राम खान

पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधत्व मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्रम खान यांनी सांगितले आहे .अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्राम खान यांची महत्त्वपुर्ण बैठक नुकतीच पार पडली .यामध्ये अल्पसनख्यांक समाजाचे विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली .येत्या विधानसभेत अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी देण्याची मागणी केली असता शरद पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे खान यांनी सांगितले आहे .

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खान यांच्याकडे अहमदनगर ,शिरूर आणि बारामती मतदार संघातील समन्व्यक म्हणून जबाबदारी होती .त्यांच्या निवडणुकीतील कार्याचेही कौतुक यावेळी करण्यात आले .
लोकसभा निवडणुकीत बऱ्याच मतदारसंघात मुलीम व अल्पसंख्याक समाजाची मतदार यादीतून नवे गायब झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर अशा ठिकाणी नव्याने मतदार नोंदणी अभियान पक्षाच्या वतीने राबवण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे .त्याचबरोबर गावगावात अल्पसंख्यांक समाजाचे संघटन करण्याचे सुचवले आहे . तसेच काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे ) यांना सोबत घेऊन स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवले जावेत असे सुचवण्यात आले आहे .
सामाजिक एकता आणि जातीय सलोखा वाढविण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली .
तसेच राज्यात एकता आणि विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांमध्ये खान यांचे मोलाचे योगदान आहे. पवारांसोबतची त्यांची भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अल्पसंख्याक समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोडी म्हणून पाहिली जात आहे .
सामाजिक कल्याण कार्यक्रम आणि अल्पसंख्याक समुदाय विकास वाढवण्यार चर्चा करण्यात आली .खान यांच्या समाजकारणातील समर्पणामुळे त्यांना व्यापक मान्यता मिळाली आहे आणि पवारांसोबतची त्यांची भेट त्यांच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जाते.तसेच आगामी काळात राष्ट्रवादी पक्षाकडून अल्पसंख्याक समाजाला सत्तेच्या मुख्य प्रवाहात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार असल्याचे इक्राम खान यांनी सांगितले आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading