Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

धायरी येथे आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

पुणे:आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस धायरी येथे खडकवासला काँग्रेस च्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.चव्हाण पाटील म्हणाले ,गोरगरिबांच्या,बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी,कलेच्या संवर्धनासाठी तसेच सामाजिक अन्यायाविरुद्ध,जातीभेद प्रथेविरुद्ध बहुमुल्य योगदान दिले. याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव अभिजित बाबर , हावेली तालुका किसान काँगेस अध्यक्ष विजय लगड,पुणे शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील, पुणे जिल्हा किसान काँगेस उपाध्यक्ष शांकरराव दांगट खडकवासला काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संजय अभंग, अनिकेत देशमुख, विजय गावंडे,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading