राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येईल – कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीबाबत प्राचार्य व संचालक यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
पुणे : येत्या शैक्षणिक वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. सर्व महाविद्यालयांना ह्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशासन ,प्राध्यापक यांच्यामध्ये सुसंवाद साधला जात आहे. या अंमलबजावणीसाठी प्राचार्यांना आपापल्या स्तरावर स्वतंत्र मुभा दिलेली आहे.’ स्कूल कनेक्ट’ माध्यमातून विद्यार्थी कनेक्टसाठी विद्यापीठ अग्रेसर आहे. याबाबत सर्वसमावेशक धोरण राबवून या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांनी केले.
खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुणे शहर व पुणे ग्रामीण मधील प्राचार्य व संचालक यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी प्राचार्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर,विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील,वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ.यशोधन मिठारे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई , विद्यापीठाच्या आय.क्यू. ए. सी.चे संचालक डॉ.संजय ढोले, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ. संगीता जगताप, कार्यशाळेचे आयोजक प्राचार्य डॉ.संजय चाकणे,कार्यशाळा समन्वयक डॉ.सुचेता दळवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी ग्रामीण व पुणे शहर मधील प्राचार्य व संचालक उपस्थित होते. प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक रूपाने कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी प्राचार्यांना सविस्तर मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीयशैक्षणिक धोरण अंमलबजावणीतील साशंकता दूर केली. डॉ.प्रमोद पाटील, डॉ. मिठारे, डॉ. प्रभाकर देसाई यांनी विद्याशाखानिहाय प्राचार्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते, डॉ. संजय खरात, आदींनी प्रश्न विचारले. समन्वयक डॉ.सुचेता दळवी, प्रा.महादेव रोकडे, प्रा.जे.डी.नाईक, प्रा. अविनाश कोल्हे, प्रा.ज्योती वाघमारे, डॉ. शैलेंद्र काळे, डॉ. पद्माकर घुले, बाबासाहेब गायकवाड, प्रा.अमृता पाटील, प्रा.वृषाली तावरे आदी प्राध्यापकांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. प्रा. स्वामीराज भिसे यांनी सूत्रसंचालन केले, डॉ.सुचेता दळवी यांनी आभार मानले.
