Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

एल अॅण्ड टी फायनान्सच्या ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसायाने ओलांडला 25 हजार कोटी रुपयांचा महत्वपूर्ण टप्पा

मुंबई : देशातील आघाडीच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेड (एलटीएफ) च्या ग्रामीण भागासाठीच्या वित्तपुरवठा व्यवसाय विभागाने 25,000 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे.

कंपनीचे हे यश म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामीण उद्योजकांना आणि लहान व्यवसाय मालकांना सक्षम बनवण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा खास पुरावा आहे. आर्थिक समावेशन आणि ग्रामीण विकासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करताना, एलटीएफचा ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसाय विभाग ग्रामीण समुदायाला सुलभ आणि परवडण्यायोग्य असे वित्तपुरवठ्याचे पर्याय प्रदान करण्यात आघाडीवर आहे.

कंपनीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कंपनीने ग्रामीण भागातील 1.4 कोटी महिला उद्योजकांना कर्ज वितरित केले आहे, महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच त्याचा विस्तारित करण्याबरोबरच त्याआधारे आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्य प्रदान करत सक्षम केले आहे. शिवाय कंपनी 14 राज्यांमधील 1,700 पेक्षा जास्त शाखांमार्फत sजाळ्यांआधारे वित्तीय सेवेपासून वंचित असलेल्या भौगोलिक क्षेत्रांपर्यंत पोहोचण्यात सक्षम झाली आहे.

कंपनीसाठी बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओरिसा ही राज्ये प्रमुख वाढीची भौगोलिक क्षेत्र ठरली आहेत. ग्राहकांशी सातत्यपूर्ण आणि सक्षम हितसंबंधाआधारे वाटचाल करणाऱ्या या बाजारपेठा कंपनीसाठी  वाढ दर्शविणाऱ्या बाजारपेठा राहण्याची अपेक्षा आहे. आपल्या बहुतांश ग्राहकांबरोबर कंपनीने वित्तपुरवठादार म्हणून आपली विशिष्टता राखली आहे.

एलटीएफचा ग्रामीण वित्त व्यवसाय मजबूत जोखीम मापदंडांच्या भक्कम आधारावर कार्यरत आहे आणि त्यामुळे कंपनी उच्च पोर्टफोलिओ गुणवत्ता राखण्यास सक्षम झाली आहे. त्याचबरोबर कार्यक्षम प्रभावी संकलन हा कंपनीसाठी सहाय्यकारी घटक राहिला असून यातून कंपनीचा व्यवसाय अतिशय सुरळीत आणि प्रभावीपणे चालतो, याचीही खात्री प्रकट होते.

कंपनीच्या या खास कामगिरीप्रसंगी टिप्पणी करताना एलटीएफच्या ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसायाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनिया कृष्णनकुट्टी (Krishnankutty) म्हणाल्या, “25,000 कोटी रुपयांचा कर्ज वितरणाचा टप्पा गाठणे ही आमच्या ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसायासाठी एक महत्त्वपूर्ण वाटचाल ठरली आहे. आमचे यश हे माहिती प्रेरित दृष्टीकोनावर आधारित आहे आणि ते आम्हाला तितकेच माहितीपूर्ण आणि प्रभावी कर्जवितरण निर्णय घेण्यास सक्षम करते. या दृष्टिकोनामुळे भक्कम वाढ राखत आम्हाला उच्च दर्जाचा पोर्टफोलिओसुध्दा साकारता आलेला आहे. गेल्या दोन वर्षांत आमचे लक्ष नवीन ग्राहक मिळवणे आणि विद्यमान ग्राहक टिकवून ठेवणे या दोन्हींवर केंद्रित झालेले आहे. बाजारात प्रत्यक्षरित्या कार्यरत असलेल्या सुमारे 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या टीमचे प्राथमिक लक्ष योग्य ग्राहकांची निवड करणे, ग्राहकांशी हितसंबंध कायम राखणे आणि कर्जाबाबत शिस्त सुनिश्चित करणे यावर केंद्रीत झालेले आहे. हेच घटक व्यवसायाचे मॉडेल टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.”

दरम्यान, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, एलटीएफच्या रिटेल पोर्टफोलिओचा आकार 80,037 कोटी रुपये झाला आहे आणि एकूण रिटेल पोर्टफोलिओत ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसायाचा वाटा तब्बल 31 टक्के आहे. शिवाय, भौगोलिक विस्तार आणि डिजिटल आविष्कारावर धोरणात्मक भर देऊन, ग्रामीण वित्तपुरवठा व्यवसाय विभाग त्याच्या वाढीचा वेग टिकवून ठेवण्यासाठी आणि आगामी वर्षांमध्ये आणखी भव्य यशासाठी सज्ज झालेला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading