टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स आणि फेडरल बँकेतर्फे धोरणात्मक बँकान्शुरन्स भागिदारी जाहीर
मुंबई : टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कं. लि. या भारतातील आघाडीच्या विमा कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या कंपनीने फेडरल बँक या खासगी क्षेत्रातील नामवंत बँकेसह बँकान्शुरन्स करार केल्याची घोषणा केली आहे. या धोरणात्मक कराराअंतर्गत फेडरल बँकेच्या ग्राहकांना टाटा एआयए लाइफची सर्वसमावेशक विमा उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
फेडरल बँकेच्या विस्तृत नेटवर्कमुळे टाटा एआयएला आपले अस्तित्व आणखी मजबूत करणे शक्य होईल. दोन्ही घटक तंत्रज्ञानावर आधारित, ग्राहकाभिमुख मॉडेलवर लक्ष केंद्रित करून भागिदारी परस्परपूरक करण्यावर भर देणार आहेत. फेडरल बँकेच्या ग्राहकांना टाटा एआयएच्या वैविध्यपूर्ण, ग्राहकाभिमुख जीवन विमा उत्पादनांचा लाभ होईल. त्यामध्ये विमा, बचत, संपत्ती निर्मिती योजना, निवृत्ती आणि पेन्शन सुविधा यांचा समावेश आहे. त्याशिवाय टाटा एआयेच्या परम रक्षक सारख्या नाविन्यपूर्ण योजनेचा त्यांना लाभ घेता येईल. या सुविधेमध्ये उच्च स्तरीय जीवन सुरक्षा कवच, बाजारपेठेशी जोडलेले परतावे, आरोग्य आणि स्वास्थविषयक लाभ असे तिहेरी फायदे मिळणार आहेत. या उत्पादनांना टाटा एआयजीची तंत्रज्ञानावर आधारित सेवा आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सच्या बँकान्शुरन्स विभागाचे प्रमुख वितरण अधिकारी रमेश विश्वनाथन म्हणाले, ‘टाटा एआयएमध्ये आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम विमा उत्पादने, असामान्य सेवेसह मिळवून देत चिंतामुक्त आयुष्य जगण्याची संधी देतो. फेडरल बँकेसारख्या प्रतिष्ठित आणि टेक्नोसॅव्ही बँकेसह दीर्घकालीन भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या सहकार्यामुळे आम्हाला बँकेच्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण विमा उत्पादने मिळवून देणे, त्यांना आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास तसेच प्रियजनांचे भवितव्य सुरक्षित करण्यास सक्षम करणे शक्य होणार आहे.’
फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालक शालिनी वॉरियर म्हणाल्या, ‘टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनीसह धोरणात्मक कॉर्पोरेट एजन्सी बँकान्शुरन्स भागिदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागिदारीअंतर्गत आमच्या मौल्यवान ग्राहकांना सर्वोत्तम विमा उत्पादने पुरवण्याचे ध्येय आहे. भारतीय ग्राहकांमधील विमा वापराचे प्रमाण खूप कमी आहे हे सर्वांना माहीत आहे. म्हणूनच या भागिदारीच्या माध्यमातून बँकेने आपल्या ग्राहकांना सुधारित आर्थिक सुरक्षा आणि संपत्ती व्यवस्थापन सुविधा देण्याचे ठरवले आहे. हे दोन प्रतिष्ठित ब्रँड्स एकत्र आल्याने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या पलीकडे जाऊन सेवा देण्याची आमची बांधिलकी दिसून आली आहे.’
सध्या विमा उद्योग स्थित्यंतरातून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भागिदारी करण्यात आली आहे. इर्डाचे ग्राहकाभिमुख नियम आणि डिजिटल क्रांतीमुळे विकासाची नवी क्षितिजे खुली झाली आहेत. २०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’ या इर्डाच्या ध्येयाकरता योगदान देण्यासाठी टाटा एआयए प्रयत्नशील आहे व फेडरल बँकेसह करण्यात आलेली भागिदारी हे त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा, संपत्ती निर्मितीच्या संधी तयार केल्या जाणार असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या संधी व परिस्थितीसाठी सक्षम केले जाणार आहे.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयए) हे टाटा सन्स प्रा. लि. आणि एआयए ग्रुप लि. (एआयए) यांच्यातील संयुक्त भागिदारी कंपनी आहे. टाटा एआयए लाइफमध्ये टाटाचे भारतातील सर्वोत्कृष्ट आणि आघाडीचे स्थान व एआयएचे, सर्वात मोठा, स्वतंत्र नोंदणीकृत पॅन एशिया जीवन विमा समूह या नात्याने आशिया पॅसिफिक भागातील १८ बाजारपेठांमध्ये असलेले अस्तित्व यांचा मिलाफ साधण्यात आला आहे.
टाटा एआयएने आर्थिक वर्ष २३ मध्ये ७०९२ कोटी रुपयांचे इंडिव्हिज्युअल वेटेड न्यू बिझनेस प्रीमियम (आयडब्ल्यूएनबीपी) उत्पन्न नोंदवले होते. आर्थिक वर्ष २२ च्या तुलनेत त्यात ५९ टक्के वाढ झाली आहे. इंडिव्हिज्युअल डेथ क्लेम सेटलमेंट रेशिओ आर्थिक वर्ष २२ मधील ९८.५३ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २३ मध्ये ९९.०१ टक्क्यांवर गेला आहे. टाटा एआयएच्या विमा योजना रिन्यू करणाऱ्या ग्राहकांची टक्केवारी दर्शवणाऱ्या पर्सिस्टन्सी रेशिओने टाटा एआयएला पाचपैकी चार निकषांमध्ये आघाडीचे स्थान दिले असून त्यात १३ महिन्यांच्या सातत्याचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २२ च्या तुलनेत १३ व्या महिन्याचा पर्सिस्टन्सी रेशिओ (प्रीमियमवर आधारित) सुधारून ८८.१ टक्क्यावर गेला आहे.
