fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsLIFESTYLEPUNE

औषधे आणि इन्सुलिनशिवाय मधुमेहाला हरवता येते: डाॅ.जयकुमार दीक्षित


पुणे  : भारतासह जगभरातल्या अनेक देशांत मोठ्या प्रमाणात मधुमेहींची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक आजार देखील वाढले आहेत, पण कर्णअक्युपंक्चर क्रियेद्वारे मधुमेहापासून सुटका होऊ शकते. यासाठी कोणतेही औषध, इन्सुलिन घ्यायची आणि कोणतेही पथ्य देखील पाळायची गरज नसल्याची माहिती प्रसिद्ध कर्णअक्युपंक्चर आणि मधुमेह तज्ज्ञ डाॅ.जयकुमार दीक्षित यांनी दिली.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना डाॅ.जयकुमार दीक्षित म्हणाले की, मी 1979 पासून अॅक्युपंक्चर थेरपीची प्रॅक्टिस करत असून आतापर्यंत 50 हजाराहून जास्त रुग्णांवर संशोधन केले आहे. संशोधनाअंती लक्षात आले की मधुमेहींच्या कानात अॅकयुपंक्चरद्वारे सुई बसवून शरीरात इंसुलिन तयार करु शकतो. कानाच्या विशिष्ट भागात इंसुलिनचा पाॅईंट असतो त्या ठिकाणी योग्यपद्धतीने जर विशिष्ट सुई लावली तर शुगर कमी होते. मधुमेह आजार नाही पण अनेक आजारांची जननी आहे.त्यामुळे कमीत कमी 100 रोग होतात जर मधुमेह राहिला नाही तर इतर आजार देखील उद्भवणार नाहीत.

अॅक्युपंक्चर विषयी सागंताना डाॅ. दीक्षित म्हणाले की, ही एक पुरातन रहस्यमय कला असून ही प्रक्रिया वैज्ञानिक आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. आपल्या शरीरातील अनेक रहस्यं यात दडलेली आहेत. कान हा पूर्ण शरीराचा किबोर्ड आहे. कानाजवळ शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मिळून 365 पाॅईंट्स आहेत. डायबेटीज रुग्णांना आयुष्यभर औषधे तसेच इन्सुलिन घ्यावे लागते. 100-100 युनिट इन्सुलिन घेतले तरी 300 च्या वर शुगर असणारे रुग्ण आढळले आहेत. अॅक्युपंक्चरने योग्य पद्धतीने केलेले उपचारामुळे रुग्णाचा मधुमेह बरा होतो. कर्णछेदन प्रक्रिया ही आपली खूप जुनी पंरपरा आहे. पण कालपरत्वे लुप्त होत गेली. अनेक राज्यांत तसेच आदिवासी भागांतही महिलांमध्ये कर्णछेदन प्रक्रिया आजही आढळून येते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading