fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

भोसरीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पिंपरी : शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे भोसरी विधानसभा प्रचार दौऱ्यात जंगी स्वागत करण्यात आले. आढळराव पाटील समर्थक व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज भोसरी विधानसभा प्रचार दौरा केला. या निमित्त मोशी येथे भेटी-गाठी केल्या आहेत. त्यावेळी त्यांचे पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या अतिषबाजित स्वागत केले.
यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पुणे जिल्हा नियोजन समिति सदस्य विजय फुगे, पिंपरी-चिंचवडचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अतिष बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश साने, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट व शिवयोद्धा ग्रुपचे अध्यक्ष गणेश सस्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading