Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRA

विकासाची गंगा आपल्या धाराशिव लोकसभा क्षेत्रात आणण्यासाठी अर्चना पाटील यांना विजयी करा मल्हार पाटील यांचे आवाहन

धाराशिव :केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना अनुकूल असलेला खासदार निवडून विकासाची गंगा आपल्या धाराशिव लोकसभा क्षेत्रात आणण्यासाठी एकजुटीने मतदान करावे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पाठबळ द्यावे.विकास केंद्रित कार्य करणाऱ्या सौ.अर्चनाताई पाटील यांना घड्याळ चिन्हासमोर बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे ही असे आवाहन महायुतीचे युवानेते मल्हार पाटील यांनी आज केले.
धाराशिव जिल्हातील समुद्रवाणी आणि इर्ला गावामध्ये नागरिकांच्या उस्फूर्त सहभागात प्रचार दौरा संपन्न झाला. यावेळी मल्हार पाटील बोलत होते.  यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दत्तनगर येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.. त्यांच्या प्रगल्भ विचारांमुळे देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकून आहे. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे असे मल्हार पाटील म्हणाले.  यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष  महेंद्र काका धुरगुडे, पदाधिकारी व भीम सैनिकांची उपस्थिती होती.
दरम्यान, बामणी, ताकविकी, तोरंबा, करजखेडा या ठिकाणी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मल्हार पाटील यांच्या प्रचार सभा संपन्न झाल्या.. प्रत्येक गावात नागरिकांच्या मनात आणि चर्चेत फक्त महायुती आणि मोदी सरकारच आहे.. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सौ.अर्चनाताई पाटील यांनी गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. राणादादांनी जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प आणले, त्याचा लाभ धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अगदी शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचत आहे.. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील हजारो नागरिक घेत आहेत. त्यातून आपले धाराशिव ‘आत्मनिर्भर’ जिल्हा म्हणून पुढे येत आहे.. निधीचा ओघ आणखी वाढवण्यासाठी आणि गतिमान विकासासाठी महायुतीचा खासदार निवडून देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन या निमित्ताने मल्हार पाटील यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading