Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRA

“अल्पसंख्याक समाज सुज्ञ,  तो महायुतीच्या पाठीमागे 100 टक्के उभा राहिलं”, तटकरेंचा विश्वास 

रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनीट तटकरे आणि अनंत गिते यांच्या पांरपारिक स्पर्धी लढत होत आहे. या निवडणुकीसाठी दोघांनीही आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. अशातच तटकरे यांना मुस्लिम मत मिळणार नाहीत. असा दावा अनंत गिते यांनी केला आहे. यावर आता सुनील तटकरे यांनी अनंत गिते यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

यावेळी तटकरे म्हणाले की, मुस्लिमांमध्ये हा अप्रचार जाणीवपुर्वक केला जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने फार मोठी प्रगती केली आहे. अल्पसंख्यांकांच्या हिताकरीता अनेक नवीन नवीन योजना राबवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने विशेषता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळाचा निधी  800 कोटी रूपयांपर्यंत गेला.  त्याला सरकारची हमी देण्यात आली. यातच आमदार भरत गोगावले यांनी या भागात किती निधी दिला. त्याचेही वाचन त्यांनी केलं आहे. अल्पसंख्याक समाज सुज्ञ आहे. तो महायुतीच्या पाठीमागे 100 टक्के उभा राहिलं.  असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

 पुढे बोलतांना ते म्हणाले की,  अनंत गिते हे एव्हीएम मशीनवर 2004 साली निवडून आले होते. त्यावेळी ते निवडून आले होते. त्यावेळी एव्हीएम योग्य होतं. पराभूत झाले तेव्हा एव्हीएम योग्य नाही. अशी भूमिका त्यांची राहिली आहे. माणुस स्वतला फसवू शकतो पण इतरांना फसवू शकत नाही. त्यांच्याकडे कोणताही विकासाचा मुद्दा राहिला नाही. त्यामुळे ते अशा पद्धतीने अप्रचाराचा प्रकार इंडिया आघाडीच्या मार्फत केला जात आहे. त्यामुळे त्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. असे म्हणत तटकरे यांनी गितेंना फटकारलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading