Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

“राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार”, अदिती तटकरेंचा विश्वास 

रायगड : रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दापोली येथे महायुती व मित्रपक्ष भाजपचे बुथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स संमेलन पार पडलं. यावेळी निवडणूक नियोजनासाठीही अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पदाकाऱ्यांची संवाद साधताना रायगडमध्ये पुन्हा सुनील तटकरे यांच्या रूपानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार. असेही त्या म्हणाल्या. तसेच आपणा सर्वांना अभिमान वाटेल असं काम त्यांच्या हातून घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्या म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. उपमुख्यमंत्रई अजितदादांच्या नेतृत्वाखाली रायगडसह संपुर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी आपण सत्तेत सहभागी झालो आहोत.  त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा सुनील तटकरे यांच्या रूपानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार. असे विधान मंत्री अदिती तटकरे यांनी रायगडमध्ये केले. 

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, सत्तेत असल्यावर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे करता येतात. महायुती आणि एनडीएच्या माध्यमातून विकास हेच आपलं लक्ष्य आहे. यापुढे येणारी प्रत्येक निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आपण लढवणार असून खासदार म्हणून तटकरे साहेब आपल्यासोबत संपूर्ण ताकदीनं उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे साहेबांना प्रचंड मतांनी रायगडचे खासदार म्हणून पुन्हा निवडून आणण्यासाठी झपाटून कामाला लागण्याचे आवाहन यावेळी तटकरे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading