fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest NewsPUNE

क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’चे उद्घाटन

रविवार दि. ७ एप्रिल पर्यंत सकाळी १० ते सायं ८ दरम्यान सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील गृहखरेदीचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’चे उद्घाटन आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित यांचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.  क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, एक्स्पो संयोजक जे पी श्रॉफ, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील, बँकांचे प्रतिनिधी, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, नवनिर्वाचित महासंचालक कर्नल रामचंद्रन, क्रेडाई पुणे मेट्रोच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, एक्सो समिती सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रविवार दि. ७ एप्रिल पर्यंत सकाळी १० ते सायं ८ दरम्यान सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सदर एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून हे एक्स्पो सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

एक्स्पोविषयी अधिक माहिती देताना जे पी श्रॉफ म्हणाले, “पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील रेरा नोंदणीकृत बांधकाम व्यावसायिकांच्या सुमारे ५०० हून अधिक गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांना या एक्स्पोमध्ये मिळणार आहे. परवडणाऱ्या घरांसोबतच आलिशान घरांच्या श्रेणीतील सदनिकांचे विविध पर्याय, निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प, प्लॉट यांची माहितीही या ठिकाणी उपलब्ध असेल. १ बीएचके पासून प्रशस्त ४ बीएचके सदनिका, आलिशान बंगले, प्लॉट, कार्यालये यांचे पर्याय येथे पाहता येतील. हे प्रदर्शन ग्राहककेंद्री असून यामध्ये सहभागी होत असलेल्या बँका, चॅनेल पार्टनर्स यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. प्रकल्प विकसक आणि त्यांच्या मार्केटिंग टीमला प्रत्यक्ष भेटण्याची संधी याठिकाणी उपलब्ध होईल. गृहखरेदीदार आणि बांधकाम व्यवसायिक यांसाठी ही एक मोठी संधी आहे.’’

क्यूआर कोड द्वारे होणारी नोंदणी, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, प्रदर्शनाचे एसी ठिकाण, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी भरपूर पार्किंग, व्हॅले पार्किंग सुविधा, किड्स झोन ही एक्स्पोची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत असेही जे पे श्रॉफ म्हणाले. 

क्रेडाई, आयजीबीसी, आयपीए, एफएसएआय आणि आयएसएचआरएई यांद्वारे सत्संग सिनर्जी सेमिनारचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे हे विशेष.

यावेळी बोलताना डॉ सुरेश गोसावी म्हणाले, “पुणे शहरासोबतच आजूबाजूच्या परिसरातील गृहखरेदीदारांना त्यांचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात एकाच छताखाली अनेकविध पर्याय उपलब्ध करून देणारे हे एक्स्पो खऱ्या अर्थाने वन स्टॉप सोल्युशन आहे असे मला वाटते. बांधकाम व्यवसायिक, गृहखरेदीदार यांसोबतच बँका, चॅनेल पार्टनर अशा अनेक क्षेत्रातील सुविधा या निमित्ताने एकाच ठिकाणी आणल्याने क्रेडाई पुणे मेट्रोचे अभिनंदन. केवळ सिमेंट, वाळू, विटा नव्हे तर माणसे जोडण्याचा हा उपक्रम आहे. या निमित्ताने एकमेकांचे स्पर्धक असलेले शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिक एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत यातूनच सर्वांनी मिळून समृद्धीकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूयात.”

या एक्स्पोच्या निमित्ताने केवळ घरांचे पर्याय नाही तर पुणे विभागातील बांधकाम व्यावसायिक वापरीत असलेले जागतिक पातळीवरील बांधकाम तंत्रज्ञान देखील ग्राहकांना माहित होईल. बांधकाम व्यवसाय क्षेत्रावर नव्या पिढीचा विश्वास आणखी दृढ व्हावा यासाठी क्रेडाई करीत असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत असे सुहास पटवर्धन म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading