अध्यात्मिकतेमुळे आपला देश जगात वेगळा – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
पुणे : अध्यातमिकता हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. जगात भारत हा एकमेव देश आहे जिथे अध्यात्मिकता आणि भौतिक विज्ञान यांचे समन्वय पाहायले मिळते. आणि म्हणूनच आपल्या देश जगात वेगळा ठरतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘भारतीय संस्कृतीची ओळख’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, भारतीय भाषा प्रशालेचे प्रमुख प्रा.प्रभाकर देसाई, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि या चर्चासत्राचे आयोजक श्री. रविंद्र शिंगणापूरकर, प्रबोधन मंच, पुणेचे श्री. हरीभाऊ मिरासदार, संस्कृत आणि प्राकृत विभाग प्रमुख डॉ. देवनाथ त्रिपाठी, डॉ. अनघा जोशी उपस्थित होते.
अध्यात्त्मिकता, अहिंसक प्रवृत्ती आणि आपला ज्ञानमार्गी समाज हे भारतीय सभ्यतेच्या मुलक अस्मितेचे तीन महत्त्वाचे घटक आहे. आणि यामुळेच मानवमात्रांची एकता, त्यातून येणारी अनाक्रमणकाराची भूमिकेमुळेच आपले जगात वेगळे स्थान आहे. आपल्या ज्ञानमार्गी समाजामुळे विश्व पटलावर आपला प्रभाव जाणवत असल्याचेही डॉ. सहस्त्रबुद्धे यावेळी म्हणाले. तसेच भारतीय समाज अद्वैतवादी असल्याचे ते यावेळी म्हणाले. इतर कार्यक्रमात आपण भविष्याचा विचार करतो पण या चर्चासत्रात आपण हजारो वर्ष मागे जाऊन आपल्या संस्कृतीचा ओळख करून घेतल्याचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर म्हणाले. भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाची व्यवस्था म्हणजेच कुटुंब व्यवस्था. यामुळेच मी मानवी मुल्यांचा विकास आणि आविष्कार करण्याच्या गोष्टी घरात शिकल्याचे प्रा.(डॉ) काळकर यावेळी म्हणाले. तर भारतीय संस्कृती समजवून घेण्याचा हा योग्य काळ आहे. मात्र हे समजावून घेताना आपण समाजातील सर्वच आणि विशेषः शेवटच्या घटकपर्यंत पोहचने गरजेचे आहे. जर तसे झाले नाही तर आपण संस्कृतीच्या खोलापर्यंत पोहोचू शकणार नाही, असे वक्तव्य प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे यांनी केले.
संस्कृत आणि प्राकृत (सी. ए. एस.एस.) विभाग आणि प्रबोधन मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात होत असलेल्या या चर्चासत्रात देशभरातील विविध मान्यवरांनी भारतीय तत्वज्ञान आणि आध्यात्मिक परंपरा, भारताची साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळख, परंपरा, चालीरीती आणि भारतीय सांस्कृतिक एकात्मता, भारतीय संत परंपरा, भारतीय उत्सव परंपरा, प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक आध्यात्मिक चळवळ आणि भारत, संस्कृत साहित्य यांसारख्या विविध विषयावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. देवनाथ त्रिपाठी यांनी तर आभार प्रदर्शन श्री. रविंद्र शिंगणापूरकर यांनी केले.
