निर्णय होऊ पर्यंत ३४ गावात एक वसुली करु नये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे:कॅबिनेट बैठकीत निर्णय होऊ पर्यंत ३४ गावातील कर वसुली व इतर कारवाई करु नये असे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देश आज पालिकेला दिले. याबाबत पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
३४ गावातील कर व इतर समस्यां बाबत तीन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत स्थानिक आमदार व सर्वपक्षीय हवेली तालुका कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीत या बाबत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.तसेच या बैठकीत पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
यावेळी आमदार भीमराव तापकीर व आमदार सुनिल टिंगरे यांनी तसेच कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील व इतर पदाधिकारी, ग्रामस्थांनी समस्या मांडल्या.
श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, मालमत्तेचे मुल्यांकन करताना मुळ कर दुप्पटी पेक्षा जास्त होऊ नये यासाठी नगरविकास विभागाने धोरण तयार करावे. गावात अद्यापही मुलभूत सुविधां नाहीत. मात्र कोट्यवधी रुपयांचा कर वसुली सुरू आहे.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे , विकास दांगट,हरिदास चरवड, पोपटराव खेडेकर, सुभाष नाणेकर,अमर चिंधे,अतुल दांगट, किशोर पोकळे, संदीप पोकळे, शेखर मोरे आदी उपस्थित होते.
विकास आराखडा मंजूर करावा, झोनिंग बदलावे, सक्तीची वसुली करु नये, शास्ती कर रद्द करावा,अभय योजना, गुंठेवारीची प्रक्रिया सुलभ करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या
