Saturday, October 3, 2026
Latest NewsPUNE

‘भगवान जगन्नाथ’ यांची चरित्र कथा रंगावलीतून साकार

पुणे : भगवान जगन्नाथ यांची पाण्याखाली,पाण्यावर तसेच पाण्याच्या मधोमध साकारलेली रांगोळी…भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा आणि बालकृष्णाची मोहक
रंगावली… याशिवाय प्रतिबिंब रांगोळी, ३ डी रांगोळी यांसह सिलिंगला काढलेली रांगोळी, रेडिओ ऍक्टिव्ह रांगोळी, मूव्हिंग रांगोळी अशा विविध संशोधनात्मक प्रकारांमधून महाप्रभू जगन्नाथजींची कथा आणि लीला कलारसिकांना रंगावलीच्या माध्यमातून अनुभवता आल्या. 

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशन तर्फे ‘जय जगन्नाथ’ या रंगावली प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन ज्योतीषाचार्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी आणि भालोद येथील प. पू. शरदचंद्र प्रतापे महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवार, जगदीश चव्हाण, प्रतीक अथणे, श्रीहरी पवळे उपस्थित होते. श्रीहरी पवळे यांना श्रीरंग कलागौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. 

प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या ८० विद्यार्थ्यांनी ३० ते ३५  तास काम करत साकारलेले रांगोळीतील अनेक संशोधने प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. 

अक्षय शहापूरकर म्हणाले, प्रदर्शनात एकूण ३२ रांगोळ्या आहेत. यामध्ये पुरी येथील जगन्नाथ मंदिर ची प्रतिकृती, जगन्नाथ पुरी येथील मंदिर कसे निर्माण झाले, त्यामागच्या अनेक रहस्य कथा, श्री जगन्नाथ जी कोण आहेत, ते कसे आले आणि त्यांनी त्यांच्या भक्तांसाठी केलेल्या लीला रंगावलीतून मांडण्यात येणार आहेत.  रंगावली प्रदर्शन दिनांक ३ फेब्रुवारी पर्यंत बालगंधर्व कलादालन येथे विनामूल्य पाहता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading