Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

राज घेणार कावेरीची मुलाखत!

कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत कावेरीने नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. किमयाने कावेरीला नोकरी करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी रत्नमालाची ही तिला साथ आहे. पण राजला मात्र कावेरीने नोकरी करनं मान्य नाही. कावेरी आता नोकरीसाठी मुलाखतीला जाणार आहे पण राजचा यासाठी विरोध असल्याने तो नकार देतो. कावेरी राजला कसं तरी मानवते. मात्र राज तिच्यासमोर एक अट ठेवतो. नोकरीच्या मुलाखतीला जाण्याआधी राज कावेरीची मुलाखत घेणार आहे. जर १० पैकी ५ प्रश्नांची उत्तर तिने बरोबर दिली तर तो तिला नोकरीच्या मुलाखतीला जाण्यास परवानगी देईल. आता कावेरी राजच्या मुलाखतीत पास होते की नाही? हे बघण्यासाठी, नक्की पहा, भाग्य दिले तू मला, उद्या रात्री, ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading