वी ने वी मॅक्स पोस्टपेड प्लॅन्सवर सुरु केले स्वीगी वन
- रुपये ५०१ आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या रेन्टल प्लॅन्सवर असलेले वी मॅक्स पोस्टपेड ग्राहक मिळवू शकतील २५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्वीगी वन मेम्बरशिप, कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता.
मनोरंजन, खाद्य, प्रवास आणि मोबाईल सुरक्षा यामधील आपल्या आवडीचे लाभ निवडण्याचे स्वातंत्र्य वी युजर्सना देणाऱ्या चॉईस या टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच सुरु करण्यात आलेल्या उपक्रमानंतर वी या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने आपल्या वी मॅक्स पोस्टपेड पोर्टफोलिओमध्ये स्वीगी हा लोकप्रिय फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म समाविष्ट करत असल्याची घोषणा केली आहे. आता वी युजर्सना मिळत असलेल्या लाभ पर्यायांमध्ये स्वीगीचा देखील समावेश झाला आहे.
आपला पोस्टपेड पोर्टफोलिओ मजबूत करत वी ने वी मॅक्सच्या व्यक्तिगत व वी मॅक्स फॅमिली युजर्सना २५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्वीगी वन मेम्बरशिप कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता मिळवण्याची संधी दिली आहे. रुपये ५०१, रुपये ७०१ चे प्लॅन्स, ११०१ रुपयांचा रेडएक्स प्लॅन तसेच १००१ आणि ११५१ रुपयांचे वी मॅक्स फॅमिली प्लॅन वापरणाऱ्या वी मॅक्स पोस्टपेड युजर्सना इतर अनेक लाभ पर्यायांबरोबरीनेच स्वीगी वन मेम्बरशिपचा पर्याय देखील निवडता येणार आहे.
|
यामुळे आता वी मॅक्स पोस्टपेड इंडिविज्युअल आणि फॅमिली प्लॅन युजर्स त्यांच्या आवडीप्रमाणे लाभ निवडू शकतील: मनोरंजन (ओटीटी): ऍमेझॉन प्राईम, डिस्ने+ हॉटस्टार, सोनीलिव आणि सनएनएक्सटी; प्रवास: ईजमायट्रिप; सुरक्षा: नॉर्टन ३६० मोबाईल सिक्युरिटी आणि खाद्य: ईझीडायनर आणि आता स्वीगी वन मेम्बरशिप
वी मॅक्स पोस्टपेड प्लॅन्समध्ये तुम्ही स्वतःचे क्रेडिट लिमिट निश्चित करू शकता तसेच प्रायॉरीटी कस्टमर सर्व्हिसचा देखील लाभ घेऊ शकता.
वी च्या नवीन पोस्टपेड प्लॅन्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे लॉग ऑन करा – https://www.myvi.in/new-connection/buy-postpaid-sim-connection-online
