टाटा कॅपिटलने सुरु केली शैक्षणिक कर्ज योजना, शिक्षणासाठी देणार १००% फायनान्सिंग
मुंबई: टाटा समूहातील प्रमुख आर्थिक सेवा कंपनी, टाटा कॅपिटल लिमिटेडने भारत, अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, सिंगापूर आणि दुबई (युएई) मध्ये उच्च शिक्षणासाठी फंडिंग हवे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज सुरु केल्याची घोषणा केली आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, व्यवस्थापन व व्यावसायिक पाठ्यक्रमांमध्ये अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, मास्टर्स प्रोग्राम करू इच्छिणाऱ्यांसाठी हे कर्ज आहे. टाटा कॅपिटलच्या शैक्षणिक कर्जामध्ये विद्यार्थ्यांना ७५ लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज आणि २०० लाख रुपयांपर्यंतचे सिक्युअर्ड लोन किंवा ट्युशन फी व राहण्याच्या खर्चासाहित शिक्षणाचा एकूण खर्च मिळेल.
टाटा कॅपिटल विद्यार्थ्यांना प्रवेश-प र्व मंजुरी पत्र देते, त्यामुळे त्यांना प्रवेश सुरक्षित करण्यासाठी आपली अर्ज प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात मदत मिळते. स्पर्धात्मक व्याज दरांव्यतिरिक्त टाटा कॅपिटलच्या शैक्षणिक कर्जामध्ये विद्यार्थ्यांना कर्ज परतफेडीचे लवचिक पर्याय मिळतात, त्यामुळे त्यांना आपल्या अभ्यासाच्या काळात परतफेड करणे सोपे जाते.
शैक्षणिक कर्जविषयी टाटा कॅपिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर – रिटेल फायनान्स श्री विवेक चोपडा यांनी सांगितले, “विश्वास आणि पारदर्शकता हे नेहमीच आमच्या व्यवसायाचे सर्वात मजबूत स्तंभ आहेत. पारंपरिक आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक कर्जाच्या व्यापक शृंखलेमध्ये ट्युशन फीपासून प्रवास आणि वैद्यकीय पर्यंत सर्व पैलूंचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनासह, उच्च शिक्षणाच्या आड येणाऱ्या सामाजिक-आर्थिक अडचणी दूर करणे आमचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या संधी मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे.”
टाटा कॅपिटलच्या शैक्षणिक कर्जाचे लाभ:
- सहजसोपी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- ७५ लाख रुपयांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
- १००% पर्यंत फायनान्सिंग
- परतफेडीचे लवचिक पर्याय
शैक्षणिक कर्जविषयी अधिक माहितीसाठी पालक व विद्यार्थी www.tatacapital.com वर किंवा कोणत्याही टाटा कॅपिटल शाखेत जाऊ शकतात.
