सिंहगडरोड डॉक्टर्स करंडकाचा मानकरी खडकवासला व नऱ्हे
पुणे -सिंहगडरोड डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंहगड रोड डॉक्टर करंडक क्रिकेट स्पर्धेत पुरुषां मध्ये खडकवासला ग्रामीण संघाने तर महिलां मध्ये नऱ्हे संघाने विजेतेपद पटकावले.
धायरी येथे डीएसके विश्व मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पाच संघ पुरुषांचे व तीन संघ महिलांचे होते .
पुरुषांच्या स्पर्धेत खडकवासला ग्रामीण संघाने विजेतेपद पटकावले तर धायरी संघाला उपविजेतेपद मिळाले. महिलांच्या स्पर्धेत विजेतेपद नऱ्हे संघाने तर उपविजेता धायरी संघाला मिळाले..
आयोजन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ .आसावरी पाटील ,उपाध्यक्ष डॉ विद्युलता दोशी , डॉ .शेखर येडगे, डॉ राजश्री काकडे , डॉ. मंगेश खटावकर, डॉ संदीप नांद्रे, डॉ .प्रताप ठुबे ,डॉ. श्रीकांत शीताळे, डॉ किरण भालेराव,डॉ सुशांत सूर्यवंशी ,डॉ आनंद पाटील आदींनी केले.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.रणजिपटू मानसिंग निगडे,अवधूत दांडेकर आदी उपस्थित होते.
