श्री राम मंदिर लोकार्पणाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त साधू वासवानी मिशनतर्फे सत्संग, हवनासह स्मरण कार्यक्रम
या सर्व धार्मिक कार्यक्रमांदरम्यान दुपारच्या सत्रात अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी अनोखा योग जुळून आला होता. यावेळी आयोजित सत्संगाला ठिकठिकाणहून भाविक उपस्थित होते. यावेळी सर्वजण रामनामाच्या आनंदात तल्लीन झाले.
या उत्सवादरम्यान सायंकाळच्या सत्रांचे आयोजन साधू वासवानी आणि जे. पी. वासवानी यांच्या पवित्र समाधीजवळ करण्यात आले. यावेळी मध्यभागी प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा उभारण्यात आली होती. यावेळी तेथे समई, दिवे, घंटा आणि फुलांनी आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. हे सर्व वातावरण विस्मयकारक आणि आध्यात्मिकरित्या मन प्रसन्न करणारे होते.
रेव्ह. साधू वासवानी यांनी केलेल्या श्रीमद्गभगवद्गीतेतील श्लोकांच्या सादरीकरणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर उपस्थितांनी अत्यंत भक्तीमय वातावरणात महाआरतीत भक्तीभावाने सहभाग घेतला. या धार्मिक सोहळ्यात भावपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आलेले श्रीराम कीर्तन हे सायंकाळच्या सत्रातील मुख्य आकर्षण ठरले. यावेळी कार्यक्रमस्थळाचा संपूर्ण परिसर रामनामाच्या गजराने भारावून गेले. कीर्तन सोहळ्यातील गायकांसोबत भाविकांनी एका तालात ‘जय राम, जय जय राम’ असा गजर करत वातावरण भक्तीमय केले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना एका भाविकाने सांगितले, की “या पवित्र स्थानावर असलेल्या सकारात्मकतेच्या उर्जेने राम उत्सवाच्या कार्यक्रमाचा आनंद आणखी वाढवला.”
यावेळी मिशनच्या कार्यकारी प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने सोहळ्यातील कार्यक्रमांची सांगता झाली. यावेळी दीदी कृष्णा कुमारी यांनी
प्रत्येक श्वासागणिक भाविकांना रामनामाचा जप करण्याबाबत प्रोत्साहित केले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आशीर्वाददेखील दिले. “तुम्ही इतरांना जितके आशीर्वाद द्याल, तितका तुमचा विवेक शुद्ध होईल.”
दीदी कृष्णा कुमारी यांनी केलेल्या या मार्गदर्शनपर शब्दांनी उपस्थित भाविक भारावून गेले. यावेळी त्यांच्या हृदय आणि मनावर या मार्गदर्शनाचा खोलवर परिणामही करून गेले.
