पेट्रोनास टीव्हीएस रेसिंगने महिला आणि रुकी श्रेणीसाठी पेट्रोनास टीव्हीएस वन मेक चॅम्पियनशीपसाठी २०२४ साठी प्रशिक्षण आणि निवड फेरी जाहीर केली
बंगळुरू : मोटरस्पोर्ट्सच्या उत्साही लोकांमधील प्रतिभेला जोपासण्यासाठी वचनबद्ध असलेल्या TVS रेसिंगला चार दशकांच्या मजबूत रेसिंग परंपरा आहे. आता PETRONAS TVS वन मेक चॅम्पियनशिपसाठी प्रशिक्षण आणि निवडीसह पुन्हा हा थरार घेऊन आली आहे. निवड फेरी जानेवारी, फेब्रुवारी आणि मे २०२४ दरम्यान चार प्रमुख शहरांमध्ये होतील. महत्त्वाकांक्षी महिला आणि धाडसी रायडर्स यासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना वन मेक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची संधी मिळते.
TVS रेसिंगने २०१६ पासून देशातील ७०० हून अधिक इच्छुक महिला रेसर्सना प्रशिक्षित केले आहे. आता महिला वर्गाच्या आठ आवृत्त्यांसाठी आणि रुकी श्रेणीच्या तिसर्या आवृत्तीसाठी प्रशिक्षण आणि निवड फेरी आयोजित करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. २०२२ पासून १८ वर्षाखालील देशातील ५० हून अधिक रुकी रेसर्सना प्रशिक्षित केल्यावर, आता आगामी प्रशिक्षण सत्राचे उद्दिष्ट तरुण रेसर्स आणि इच्छुकांना मोटरसायकल रेसिंगची आवड निर्माण करण्यासाठी संधी निर्माण करणे आहे.
यावेळी बोलताना TVS मोटर कंपनीचे बिझनेस हेड – प्रिमियमविमल सुंबली म्हणाले की, “टीव्हीएस रेसिंग १९८२ पासून भारतातील मोटरस्पोर्ट्स संस्कृती वाढविण्यात एक पुढे आहे. आमच्या वन मेक चॅम्पियनशिपसह आम्ही सर्व जेंडर आणि वयोगटातील रेसिंग उत्साही लोकांसाठी त्यांच्या मोटरस्पोर्ट कारकीर्दीची सुरुवात करण्यासाठी एक डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ‘रेसिंगचा झेंडा कुणाशीही भेदभाव करत नाही’ या आमच्या मूळ तत्त्वज्ञानाने आम्ही २०१६ मध्ये महिला चॅम्पियनशिप सुरू करणारे पहिले ठरलो. आमची रुकी चॅम्पियनशिप ही TVS रेसिंग फॅक्टरी रेसर बनण्याच्या शिडीवरील पहिली पायरी आहे. आम्ही एक सर्वसमावेशक कार्यक्रम तयार केलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण समर्थन आणि ट्रॅक प्रशिक्षण समाविष्ट आहे. त्याचे मोटरस्पोर्ट समुदायाने मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे.
निवड फेरीचे प्रमुख मुद्दे:
- सर्व फेऱ्यांमध्ये PETRONAS TVS रेसिंगमधील राष्ट्रीय चॅम्पियन्सद्वारे आयोजित पूर्ण दिवसाच्या प्रशिक्षण सत्रांचा समावेश असेल.
- प्रशिक्षण वेळापत्रक सहभागींना त्यांचे कौशल्य वाढवण्यास आणि रेसिंग मोटारसायकल आणि ट्रॅकसह परिचित होण्यास मदत करेल
- रेसर्सना रेस-स्पेस TVS Apache RTR 200 आणि RR 200 मोटरसायकलवर स्पर्धा करण्याची संधी मिळेल.
- या प्रशिक्षणांमुळे शॉर्टलिस्टेड रेसर्सना २०२४ इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप (INMRC) पूर्वी त्यांची शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल.
- सहभागींना रेसिंग गीअर्सचा संपूर्ण संच देखील मिळेल – सूट, हातमोजे आणि बूट (उपलब्धतेनुसार)
| श्रेणी | तारीख | शहर |
| महिला | २७ जानेवारी २०२४ | रेमंड रेस ट्रॅक, मुंबई-मुंबई |
| महिला | ४ फेब्रुवारी २०२४ | कार्टोमनिया, गो-कार्टिंग, एंटरटेनलँड मॉल, गुरुग्राम – नवी दिल्ली |
| महिला | ११ फेब्रुवारी २०२४ | ECO पार्क – कोलकाता |
| महिला आणि रुकी | ११ आणि १२ मे, २०२४ | MIC – चेन्नई (फायनल) |
निवडीचे निकष –
- महिला वर्ग : वैध दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना अनिवार्य आहे; सर्व सहभागी १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असावेत (वय १५-१८ वर्षे कोणत्याही रेसिंग ट्रेनिंग स्कूलमधून मिळालेले लेव्हल-1 FMSCI प्रमाणित प्रशिक्षण सादर करणे आवश्यक आहे)
- रुकी श्रेणी : FMSCI द्वारे मान्यताप्राप्त प्रशिक्षण अकादमीकडून लेव्हल-1 प्रमाणित करून सहभागींचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त आणि १८ वर्षांपेक्षा कमी ( जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले) असावे.
नोंदणीसाठी, कॉल करा (+91 9632253833)
