Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग पार्ट-1, जॉन विक 4 सारख्या हॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांसोबत ‘पठाण’ ला वल्चर स्टंट अवॉर्ड्समध्ये नामांकन

 

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा पठाण हा ऐतिहासिक ऑल-टाइम ब्लॉकबस्टर ठरला आहे आणि रिलीज झाल्याच्या एका वर्षानंतरही तो सतत चर्चेत आहे. जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मोठ्या रोख रकमेची नोंद केली आणि त्यावेळच्या हिंदी चित्रपटांच्या इतिहासात जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणून स्वत:ला स्थानापन केले. 100 टक्के हिट रेकॉर्ड असलेला वाईआरएफ च्या स्पाई यूनिवर्स मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील बनला आहे! (‘Pathan’ nominated for Vulture Stunt Awards alongside Hollywood blockbusters like Mission Impossible: Dead Reckoning Part-1, John Wick 4 )

पठाणला आता प्रतिष्ठित वल्चर अॅन्युअल स्टंट अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळाले आहे. व्‍यक्‍तींनी केलेल्या स्‍टंट कार्यातील उत्‍कृष्‍टतेचा गौरव करण्‍यासाठी, मीडिया ऑर्गनायझेशन वल्चर द्वारे आयोजित केलेला आंतरराष्‍ट्रीय पुरस्कार 2023 मध्‍ये सुरू झाला.

शाहरुख खान आणि जॉन यांच्यातील जेट-पॅक फाईट सीन असलेल्या पठाणच्या आयकॉनिक क्लायमॅक्स सीक्वेन्सला बेस्ट एरियल स्टंट श्रेणी अंतर्गत नामांकन मिळाले आहे.

टॉम क्रूझ स्टारर मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग पार्ट-1, कीनू रीव्सचा जॉन विक 4, विन डिझेलचा फास्ट एक्स यासारख्या हॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांसह पठाणला सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे.

देशातील सर्वात मोठे सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची भूमिका असलेला पठाण हा आदित्य चोप्राच्या वायआरएफ स्पाई यूनिवर्स चा एक भाग आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading