महाराष्ट्र गंधर्व नाट्यसंगीत स्पर्धा 4 फेब्रुवारी २०२४ रोजी
पुणे : भरतनाट्य संशोधन मंदिर आणि पुणे व लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी घेण्यात येणारी नाट्यगीत गायन स्पर्धा यंदा रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. स्पर्धेचे आयोजन चार गटात करण्यात आले आहे. ८ ते १५ वर्षे हा पहिला गट असेल, दुसरा गट १६ ते ४० वर्षे, तिसरा गट ४१ ते ६० वर्षे व ६१ वर्षे आणि पुढील असा चौथा गट असेल. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ ३ अशी एकून ५ रोख बक्षिसे व ट्रॉफी दिली जणार आहेत. बक्षीस समारंभ त्याच दिवशी संध्याकाळी भरत नाट्य मंदिर येथेच संगीत नाटक क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्राचा संगीत नाटकाचा समृद्ध वारसा पुढे चालविण्यासाठी ही स्पर्धा मोलाचा हातभार लावत आहे. यामुळे व्यासपीठावर नाट्यगीत सादरीकरणाचा अनुभव व प्रशिक्षण मिळणार आहे. महाराष्ट्रगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धा 2013 साला पासुन भरवली जात आहे
स्पर्धकांना स्पर्धेचाऑनलाईन अर्ज https://forms.gle/
