Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘ईश्वरपुरम्’मध्ये ‘पद्मनाभ आचार्य कौशल्य विकास केंद्र’ निर्माण करणार – भैय्याजी जोशी

पुणे  : नागालँडचे भूतपूर्व राज्यपाल कै. पद्मनाभजी आचार्य यांच्या स्मरणार्थ ‘ईश्वरपुरम्’मध्ये ‘पद्मनाभ आचार्य कौशल्य विकास केंद्र’ सुरू करण्याची घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी नुकतीच केली. फुलगांव, पुणे येथील ‘ईश्वरपुरम्’ या पूर्वोत्तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतीगृहाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिकोत्सवात ते बोलत होते. 

‘ईश्वरपुरम्’ संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, प्रा. अनिरूध्द देशपांडे, नरेश करपे, माजी आमदार दीपक पायगुडे यांसोबतच रोटरी क्लब ऑफ नॉर्थ बाँबेचे पदाधिकारी, फुलगांव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, लोकसेवा शिक्षण संस्थेचे शिक्षक तसेच स्थानिक नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते  

ईशान्य भारतातील नागालँड व अरुणाचल प्रदेश या दोन प्रांतांमधून आलेली दुसरीपासून १० पर्यंतच्या विभिन्न वयोगटातील ४१ मुले सध्या या वसतीगृहात आहेत. वसतीगृहातील विद्यार्थ्यांबरोबरच स्थानिक तरुणांना उपयुक्त ठरणारे छोटे कोर्सेस या माध्यमातून नविन शैक्षणिक वर्षापासून प्रारंभ होतील, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

लोकसवा प्रतिष्ठानचे दीपक पायगुडे यांच्या ‘नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळे’तील ७५ विद्यार्थी आणि ५० विद्यार्थिनींनी देखील यावेळी कार्यक्रमात सहभागी होऊन आपली चित्रकला प्रदर्शित केली.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई या भागातून उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading