महावितरणमध्ये महिलांचे योगदान मोलाचे – राजेंद्र पवार
पुणे : महिला या आज जगातील सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत त्याप्रमाणेच महावितरण मध्ये सुद्धा महिलांचे योगदान अतिशय मोलाचे असल्याचे मत महावितरण पुणे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद पवार यांनी व्यक्त केले .
मकर संक्रांती निमित्य महावितरण तांत्रीक विभाग ( सोलर रूफ टॅाप प्रकल्प सलग्न ) याविषयी कार्यशाळा व रणरागिणी कौतूक सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पवार बोलत होते .
मकर संक्रांत “म्हणजे उत्तरायण . सूर्य जास्तीत जास्त जास्ती पृथ्वीच्या जवळ येतो त्यामुळे साहजीक तापमान व तपमान वाढते . सकारात्मक शक्ती व चेतना जागृत होते . अंधकाराचा नाश होतो व प्रकाशाचे स्वागत होते . त्यामुळे याच दिवसाचे महत्त्व जाणून ,सोलर रूफटॅाप सिस्टीम प्रोग्राम मध्दे महावितरण पुणे शहरातील आपल्या ज्या रणरागीनी ( महिला तांत्रीक अधिकारी ) व प्रत्यक्ष फील्डवर काम करणार्या तांत्रीकी कर्मचारी भगिनी यांना सोलर रूफटॅाप या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले . त्याशिवाय “सोलर रूफटॅाप सिस्टीम प्रोग्राम “ मध्दे उत्कृष्ट काम करत असणार्या महिला अधिकारी व तांत्रिकी कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगीरी बध्दल विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजन सूर्याटेक सोलर चे मुकूंद कमलाकर यांनी केले होते .याकार्यक्रमास मुख्य अभियंता राजेंद्र पवार ,डॉ.संतोष पट्टी ,प्राचार्य शोभा कमलाकर तसेच महावितरनचे कर्मचारी व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
