Sunday, October 4, 2026
Latest NewsPUNE

सामर्थ्य, योग्यता आणि कमतरतेचा विचार करून ध्येय ठरवा – संदीपसिंह गिल

पुणे : परिस्थितीचा विचार न करता तुम्ही जर तुमचे सामर्थ्य, योग्यता आणि कमतरता याचा विचार करून तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन पुणे शहर पोलिस उपायुक्त परिमंडळ १ चे संदीपसिंह गिल यांनी केले.

श्रीकांत भावे स्मृती करंडक इंग्रजी संवाद स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संदीपसिंह गिल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. स्पर्धेचे आयोजन माजी विद्यार्थी संघ, आदर्श शिक्षण मंडळी, नातूबाग परिसारच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेत छोटया गटात खराडी येथील सुंदराबाई मराठे विद्यालय तर मोठ्या गटात माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी विद्यालय यांनी विजेतेपद पटकावले तर गेनबा सोपानराव मोझे शिक्षण संस्थेने एकूण ८ बक्षिसे मिळवत घवघवीश यश मिळवले.

स्पर्धेचे उद्घाटन आदर्श शिक्षण मंडळी चे मानद सचिव प्रकाश जोशीराव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात संदीपसिंह गिल तसेच खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने, संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड, खजिनदार रेखा मोरे, स्पर्धा प्रमुख प्रशांत मते व डी.पी.जोशी, वंदना भावे, शिरीष मोहिते, नितीन होले, गिरीष भोईटे, सारिका सणस, नयना नाईक, राधिका मंडलिक, आरती गोसावी, किरण रासकर, सुनिल घुले, आनंद आंबेकर आदी उपस्थित होते. मुग्धा महादेवकर व मेघना अभ्यंकर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष होते. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.

संदीपसिंह गिल पुढे म्हणाले, आज मी किती मागे आहे हा विचार करण्यापेक्षा मला किती पुढे जायचे आहे याचा अभ्यास केला तर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. रोज व्यायाम करा, चांगले जेवण करा, रोज एक पुस्तक वाचा आणि तुम्हाला माहिती झालेल्या नविन गोष्टी तुमच्या सहकार्यांबरोबर शेअर करा असा सल्ला देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अरुण पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

इयत्ता ५ वी ते ७ वी छोटा गट : १) सुंदराबाई मराठे विद्यालय, खराडी २) गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, येरवडा ३) श्री. सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी उत्तेजनार्थ :  १) श्री. एकनाथराव खेसे विद्यालय, लोहगाव, २) ग.रा पालकर प्राथमिक शाळा, उत्कृष्ट संवाद कौशल्य :  ऋग्वेद क्षीरसागर (अभिनव हायस्कूल, मराठी माध्यम), उत्कृष्ट लेखन : मानसी कुलकर्णी, (ग.रा पालकर प्राथमिक शाळा), उत्कृष्ट दिग्दर्शन : एस. व्ही. जाधव (तु.गो. गोसावी माध्यमिक विद्यालय)

गट ८ वी ते १०वी मोठा गट ः १) माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय २) सुंदराबाई मराठे विद्यालय, खराडी ३) हुजूरपागा विद्यालय, कात्रज उत्तेजनार्थ : १) श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी, २) अहिल्यादेवी हायस्कूल, उत्कृष्ट संवाद कौशल्य : कार्तिकी घोडके (सयाजीनाथ महाराज विद्यालय), उत्कृष्ट लेखन :  विकास मडके (गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, येरवडा) उत्कृष्ट दिग्दर्शन : वसंत सुर्वे (अभिनव विद्यालय मराठी माध्यम)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading