Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRA

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा परभणी च्या वतीने 30 वा नामविस्तार दिन साजरा

परभणी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीटाचा 30 वा नामविस्तार दिन बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशन जवळील पुतळ्याजवळ तालुका अध्यक्ष एम. एम .बरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आलं नंतर सामूहिक त्रिसरण व पंचशील घेण्यात येऊन समता सैनिक दलाच्या वतीने ध्वज सलामी देण्यात आली. यावेळी बौद्धाचार्य एम. एम. भरणे , नामांतर लढ्यातील योध्या राणू माय वाळवळ, रामचंद्र रोडे ,जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी डि. आय. खेडकर, व्ही. व्ही. वाघमारे ,सुनील पवार ,एस. एस. साळवे, के.जी.लझडे,बाबासाहेब धबाले, नामदेव ढेपे, अतुल वैराट, नागसेन हत्ती आंबेरे, पी .एल. वानखेडे, भारत देवरे, गोपीनाथ कांबळे, मिलिंद वाघमारे, संदीप खाडे, संजय बगाटे, भूषण मोरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका सरचिटणीस सुनील कोकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वनाथ झोडपे यांनी मानले, शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading