आमचे हिंदू गुरू शंकराचार्य थोर. गप्प बस रे नाऱ्या कोंबडी चोर. कॉँग्रेसचे आंदोलन
पुणे : भाजपा चे वाचाळवीर नेते व केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्याचे योगदान काय? असा प्रश्न विचारून तमाम हिंदूचा अपमान केला आहे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. आमच्या गुरूंचा अपमान केला त्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार दि. १४/०१/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा., बालगंधर्व रंगमदिर चौक, झाशीची राणी पुतळ्याजवळ, पुणे येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांची निषेधार्थ भाषणे झाली, यावेळी आ. रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, पूजा आनंद, रफिक शेख, अजित दरेकर,बाळासाहेब दाभेकर, अभिजित गोरे, प्रकाश पवार, द.स. पोळेकर, राजू ठोंबरे, रमेश सकट,हेमंत राजभोज असिफ शेख, संतोष पाटोळे,देविदास लोणकर, उषा राजगुरू, राज गहलोत भगवान कडू आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
