Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

संगीतसृष्टी हळहळली; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन  

पुणे : स्वरयोगिनी, पद्मविभूषण, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने संगीत सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या वयातही त्या संगीताचे कार्यक्रम करत होत्या. आज देखील प्रभा अत्रे यांचा ‘स्वरप्रभा’ हा कार्यक्रम मुंबईमध्ये होणार होता. त्यासाठी त्या आज पुण्याहून मुंबईला निघणार होत्या. मात्र, आज पहाटे साडे तीनच्या सुमारास झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. अत्रे यांची अमेरिकास्थित भाची आल्या नंतर मंगळवारी प्रभा अत्रे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण संगीत सृष्टी हळहळली आहे.

सवाईमध्ये त्या गाणार होत्या पण …..

गेल्या दोन दशकांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता ही ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनानेच होत आहे. यंदा देखील पुण्यात डिसेंबर महिन्यात संपन्न झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रभा अत्रे गाणार होत्या. मात्र, प्रभा अत्रे प्रकृती अस्वस्थामुळे या महोत्सवात येवू शकल्या नाहीत. त्यामुळे सवाईच्या समरोपात त्यांचे गाणे ऐकण्याची संधी संगीत प्रेमींना मिळू शकली नाही.

प्रभा अत्रे यांचा जीवनप्रवास

प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका होत्या. प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होत्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. तसेच त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.   संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading