Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

लावण्याने आणली राघववर संक्रांत…

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जोडी ‘रमा राघव’ आता अनंत अडचणींवर मात करत,प्रेमाच्या रंगात रंगत संसारात रुळत चालली आहे, मात्र लग्नाला वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळवण्याची त्यांची धडपड अजूनही सुरू आहे. राघवच्या वडिलांचा कडवा विरोध ते रमाच्या आईचे तिला परत घरी आणण्याचे प्रयत्न या कात्रीत अडकलेल्या या जोडीला मोठा धक्का द्यायचे रमाची आई ठरवते.
लावण्या मकरसंक्रातीला राघववर संक्रांत आणते, मात्र आज उत्तरायणाच्या दिवशी हे ग्रहण भेदून राघव नावाचा सूर्य कसा तळपतो ते तू आता बघच असा प्रेमावरचा , नात्यावरचा दृढविश्वास रमा व्यक्त करते.
रमाचा हा विश्वास राघव कसा सिद्ध करतो आणि ‘रमा राघव’च्या आयुष्यात ‘शुभ संक्रमण’ येते का? राघववर आलेली संक्रांत टळेल? याची उत्कंठावर्धक गोष्ट या भागात पाहायला मिळेल.
नक्की पाहा, रमा राघव, महारविवार, ‘मकर संक्रांत विशेष’, उद्या दु. १.०० वा. आणि संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading