Monday, June 22, 2026
BusinessLatest News

निहिलंट लिमिटेड कंपनीचे संस्थापक आणि प्रवर्तक एल. सी. सिंग यांनी एनटीटी लिमिटेडची मालकी संपादन केली

पुणे: भारताच्या आयटी क्षेत्रासाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. निहिलंट लिमिटेड या जागतिक सल्लागार आणि सेवा कंपनीने घोषणा केली की कंपनीचे संस्थापक आणि प्रवर्तक एल. सी. सिंग यांनी एनटीटी लिमिटेड कडून कंपनीमधील मोठा हिस्सा विकत घेतला आहे.

या संपादनामुळे निहिलंट ही एक अशी कंपनी बनेल जिची मालकी व्यवस्थापनाच्या हाती असेल. आयसीआयसीआय प्रुडेंशियल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्सचा आयसीआयसीआय प्रुडेंशियल कॉर्पोरेट क्रेडिट अपॉर्च्युनिटीज फंड एआयएफ-आय आणि पिरामल अल्टरनेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड द्वारे व्यवस्थापित केलेले पिरामल स्ट्रक्चर्ड क्रेडिट अपॉर्च्युनिटीज फंड आणि परफॉर्मिंग क्रेडिट फंड यांसारख्या आघाडीच्या फंडनी मिळून 69.16 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी हे कर्ज दिले आहे.

निहिलंटची बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्याची, त्याचे आयपी आणि उत्पादने बाजारात आणण्याची, सध्याची क्षमता वाढवण्याची आणि नंतर एआय, एमएल, एक्सआर आणि जनरेटिव्ह एआय मध्ये त्याच्या सेवांचा विस्तार करण्याची दृष्टी आणि वचनबद्धता लक्षात घेता हा मोठा हिस्सा मिळवणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

निहिलंटची स्थापना 2000 मध्ये उद्योग क्षेत्रातील दिग्गज एल. सी. सिंग यांनी केली होती. ही जागतिक सल्लागार आणि सेवा कंपनी समस्या सोडवण्यासाठी आणि मोठ्या बदलांचे व्यवस्थापन करण्यासाठी मानव-केंद्रित दृष्टिकोन वापरते. सध्या कंपनी दक्षिण आफ्रिका, भारत, यूएसए, स्वीडन, यूके आणि ऑस्ट्रेलिया मध्ये कार्यरत आहे.

एल.सी. सिंग, कार्यकारी अध्यक्ष, निहिलंट म्हणाले, “आम्हाला एनटीटी लिमिटेड कडून एक मोठा हिस्सा विकत घेतल्याची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. या धोरणात्मक हालचालीमुळे आम्हाला निहिलंटच्या व्यवसायावर पूर्ण नियंत्रण आणि स्वायत्तता प्राप्त होईल, ज्यामुळे आम्हाला आमची दृष्टी आणि व्यावसायिक धोरणे अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येतील. एनटीटी लि.ने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या समर्थन आणि सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आमच्या यशात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या मदतीने रचलेल्या पायावर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

हे संपादन निहिलंटच्या नवकल्पना वाढवण्याच्या, मजबूत ग्राहक संबंध निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या भागीदारांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या वचनबद्धतेला पूरक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading