उस्ताद रशिद खान यांचे निधन
नवी दिल्ली : संगीत उस्ताद म्हणून ओळखले जाणारे उस्ताद रशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले. उस्ताद रशिद खान हे काही काळापासून कर्करोगाशी झुंजत होते. त्यांच्यावर कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांना शनिवारी दक्षिण कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ
राशिद खान २० -२१ वर्षांचे असताना १९८६ -८७ साली सवाई गंधर्व महोत्सवात मी त्यांचे गायन पहिल्यांदा ऐकले होते. त्या वेळी दिसायला ते अगदी किडकिडीत होते मात्र त्यांच्या बुलंद, गोल आणि सुंदर आवाजाने पुणेकरांवर खास प्रभाव पाडला. उस्ताद राशिद खान हे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे भक्त होते, त्यामुळे आमच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाले. २००० सालाच्या आधी आम्ही पुणे, मुंबई येथे अनेक ठिकाणी भेटायचो. ते दोन वेळा आमच्या घरी खाजगी मैफलीत गायले होते. खानदानी व संगीताची सौदर्यदृष्टी असलेले व्यक्तीमत्त्व आज आपण गमावले आहे. वागायला बोलायला उस्ताद राशिद खान अगदी साधे होते. त्यांच्या वागण्यात कधीही मोठेपणा नसायचा. आयुष्याच्या पूर्वार्धात खडतर परिस्थितीत त्यांनी संगीतसाधना केली होती. आज त्यांच्या विषयीच्या अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना.
राहुल देशपांडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक
राहुल देशपांडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक
उस्ताद राशिद खान यांचे जाणे ही धक्कादायक आणि दु:खद अशी ही बातमी आहे. उस्ताद राशीद खान यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीताची मोठी हानी झाली आहे. मी कायम त्यांच्याकडे एक आदर्श गायक म्हणून पाहायचो. आम्ही एकत्र गाणार होतो, पण दुर्दैवाने ते झाले नाही. व्यक्तीश: त्मयांच्लाया जाण्याने मला खूप दु:ख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
