Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पारंपारिक लोक कलावंत करतायेत नाट्य संमेलनाचा प्रचार

पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन तोंडावर आहे. अन् या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड अन् पुणे शहरात सर्वत्र पिंगळा, गोंधळी, वासूदेव आदी पारंपरीक लोक कलावंतांकडून नाट्य संमेलनाचा प्रचार होत असल्याचे चित्र आहे. पहाटेच्या वेळी वासुदेवांच्या वेशात आलेल्या लोक कलावंतांकडून प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना नाट्य संमेलनासाठी आमंत्रित केले जात आहे. त्यामुळे उद्योग नगरी ही सांस्कृतिक वातावरणात न्हावून निघाली आहे. 

“ऐका दादा वहीनी ऐका दादा वहीनी
तुम्ही यायच जोडीणी
पाहू नाट्य संमेलन विसरु नका कोणी ll

कलावंतांच फ़ुलणार मळा
तिथं सारयांनी व्हायच गोळा
आहे आनंदाचा हा सोहळा
जीवन जगण्याची जणू ही शाळा
सहा तारीक सात तारीक
नव्या वर्षाची पर्वणी
पाहू नाट्य संमेलन विसरु नका कोणी ll1ll”

असे प्रचार गीत गावून हे लोककलावंत नांगरिकांपर्यंत नाट्य संमेलन पोहचवत आहेत. विशेष म्हणजे नांगरिकांकडूनही अशा प्रकारच्या प्रचाराचे स्वागत केले जात असून नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांच्या या संकल्पनेचे कौतुक करत आहेत.

या विषयी बोलताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, काळाच्या पडद्याआड लोप पावत चाललेली जी लोककला आहे. ती पुन्हा लोकांपर्यंत पोहाचावी या उद्देशाने आम्ही या १०० व्या नाट्य संमेलनाच्या प्रचारासाठी या लोककलांचा वापर केला आहे. यामुळे त्यांनाही काम मिळाले अन् लोककला देखील आम्ही नाट्य रासिकांपर्यंत पोहचवू शकलो. भारुडी, पिंगळा, गोंधळी, वासूदेव, भिल्ल, डोंबारी, धनगर या अस्सल लोककलावंतां मार्फत हा प्रचार सुरू असून लोकांनाही तो आवडत आहे. हे सर्व लोककलाकार निलंगा, उस्मानाबाद, सोलापूर, अकोला या भागातून आलेले आहेत. सर्व घटकांना सामावून घेवून हा नाट्य संमेलनाचा सोहळा साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading