Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मनोज जरांगे यांच्या गावातील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

मुंबई : मराठा समजातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, अंबड तालुक्यातील १२ गावांमध्ये केवळ १२७ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तसेच अंतरवाली सराटी येथे एकही कुणबी नोंद सापडलेली नाही. त्याबरोबरच मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबामध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाही.

मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची तसेच अंतरवाली सराटीमधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कुणबी नोंदी सापडल्या नाहीत की त्या जाणूनबुजून मिळवल्या नाहीत, हा प्रश्न आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. राज्यातील समाज आमचाच आहे. एक इंचही मागे हटणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी ठकावून सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading