Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘नया साल, नया खासदार’ ! ॲड. प्रकाश आंबेडकरांचे बॅनर व्हायरल

अकोला – “नया साल, नया खासदार” म्हणतं अकोला शहरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरली आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे शहरातील कृषी नगर भागात असलेल्या निवासस्थाना जवळ हे बॅनर लागले असून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून लावल्या या बॅनरची सध्या शहरभरात चर्चा सुरू आहे. शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर दिसून आले आहेत.

राधा कृष्ण टॉकीज, जिल्हा परिषद समोर, पंचायत समिती समोर, जुने शहर डाबकी रोड, रेल्वे स्टेशन चौक, टॉवर चौक यासह वेगवेगळ्या भागात जोरदार बॅनरबाजी बघायला मिळत आहे.

अकोल्यात नुकताच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठी जाहीर सभा ॲड. आंबेडकर यांची पार पडली होती. त्या सभेला रेकोर्ड ब्रेक लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्याचबरोबर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यभरातील सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

या पार्श्वभूमीवर “नया साल, नया खासदार” म्हणत वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading