Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

जयप्रकाश नारायण यांच्या विचारांची देशाला गरज: डॉ. कुमार सप्तर्षी

 

पुणे: लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार सोहळा २०२३ चे आयोजन शनिवार दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन , कोथरूड येथे आयोजित करण्यात आले होते.

अभिनेते किरण माने, प्राज इंडस्ट्रीज चे राजेंद्र सखाराम मोरे, दिग्दर्शक सागर वंजारी, लेखक विनायक होगाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप होते.

भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे प्रमुख किसन भोसले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते.महाराष्ट्र बिझनेस क्लबचे आदित्य बर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबा धुमाळ, यांनी पुरस्कार्थीना शुभेच्छा दािल्या .

प्रदिप (बाबा) धुमाळ, लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार समिती प्रमुख आयोजक राहुल शेलार, सुनील कदम , धनंजय भावलेकर , संदिप बर्वे , जांबुवंत मनोहर ,सचिन पांडुळे, सौ. दिपाली धुमाळ , संतोष मेढेकर, सतिश शेलार ,अरविंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद चव्हाण यांनी आभार मानले.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नावाचा पुरस्कार म्हणजे खूप़ मोठा ठेवा आहे. हे सर्व पुरस्कारार्थी त्याला पात्र आहेत. जयप्रकाश नारायण विवेकशील आणि सद्सद्विवेकबुद्धी जपणारे आणि हळवे होते. जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी माझे गुरू होते.

आज देशात हुकुमशाहीचं सावट आहे. आता काही हालचाल केली नाही तर देशाचे काही खरे नाही.पंतप्रधान म्हणून एकही कर्तव्य नीट पार पाडले गेले नाही. अर्थव्यवस्था, एकात्मता, शेजारील राष्ट्रांशी संबंध नीट ठेवले नाही. ही हुकुमशाही घालवली पाहिजे. इंदिरा गांधीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्यासारखे सद्सद्व विवेक बुद्धी असणारे नेते होते. आत्ता ते नाहीत. त्यांची उणीव भासते आहे.त्यांचें विचार आताच्या परिस्थितीत दिशा दर्शक असून पुढे नेले पाहिजेत. प्रत्येकाने नैतिकता वापरली पाहिजे. यावेळी कमळाला मतदान करू नका. चुकीचं मतदान केलं तर पुढील पिढीला आपण सजा दिल्यासारखे होईल.

अभिनेते किरण माने यांनी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘ तुम्हाला अभिमान वाटेल असे काम आम्ही करू. कला आणि सामाजिक जाणीवा एकजीव झालं तर त्यातून कला आधिक प्रभावी होते. कलाकार विद्रोही असला पाहिजे. कलाकाराला समाज भान असणं गरजेचे आहे ‘.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading