Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

शिवानी नाईकची पहिली गाडी

आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी नेहमी खास असतात मग ते पाहिलं काम असो, पहिली कमाई असो, पाहिलं घर असो किंवा पहिली गाडी. झी मराठीवरील चर्चित मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ मधील शिवानी नाईक म्हणजेच तुमची लाडकी कलेक्टर अपर्णा सुरेश माने (अप्पी) हिने नुकतीच आपली पहिली गाडी घेतली आणि तिच्यासाठी तो क्षण खूप आनंदाचा होता. आपल्या ह्या यशस्वी स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त करताना शिवानी म्हणाली, ‘गाडी घ्यायची असं काही ठरलं नव्हतं पण असं वाटलं की शूटिंगला जाण्यासाठी अप्पीचीही गाडी असली पाहिजे. मी जेव्हा घरी सांगितले की मला गाडी घ्यायची आहे तेव्हा बाबा म्हणाले मी घेऊन देतो पण माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे, मला स्वतःच कष्टाने ही गाडी घ्यायची आहे, बाबांना याचा खूप अभिमान वाटला. मी संपूर्ण परिवारासोबत गाडी आणायला गेलो. माझ्या हातात जेव्हा माझ्या पहिल्या गाडीची चावी आली तो क्षण माझ्या हृदयात कोरला गेली आहे. मी एक शांत चालक आहे कारण अप्पीला नियम तोडून चालणार नाही आणि अप्पीची भूमिका निभावता निभावताना माझ्या आयुष्यात सुद्धा मी अप्पीच्या काही गुणांचा समावेश केला आहे.

पाहायला विसरू नका तुमच्या झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ सोमवार ते शनिवार संध्या ६:३० वाजता

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading