Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

जे पी श्रॉफ यांचा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मान

पुणे : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने देण्यात येणारा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार बांधकाम व्यवसायिकांची संस्था असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य जे पी श्रॉफ यांना नुकताच प्रदान करण्यात आला. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन शोध आणि सतत अत्युत्तम प्रयत्न केल्याबद्दल श्रॉफ यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वतीने आयोजित तेजोनिधी या कार्यक्रमात सदर पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यसभा खासदार अॅड वंदना चव्हाण यांच्या हस्ते श्रॉफ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. रोटरी डिस्ट्रीक ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके, आयटी तज्ज्ञ व रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ दीपक शिकारपूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जे पी श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल क्रेडाई अंतर्गत आजवर ५० हजारांहून अधिक बांधकाम कामगारांचे यशस्वी कौशल्य प्रशिक्षण घेण्यात आले आहे. साओ पाओलो- ब्राझील, अबु धाबी आणि काझान येथे संपन्न आलेल्या ‘ब्रिकलेइंग आणि टाइलिंग’ प्रकारात जागतिक कौशल्य ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले याबरोबरच सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्टतेचे पदकही जिंकले हे विशेष.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading