Monday, August 31, 2026
BusinessLatest News

‘गेमप्ले’चा अनुभव वाढवण्यासाठी ‘सोनी इंडिया’तर्फे ‘इनझोन एच-फाइव्ह वायरलेस गेमिंग हेडसेट’ सादर

नवी दिल्ली : ‘सोनी इंडिया’ने ‘इनझोन एच-फाइव्ह’ हे नवे वायरलेस हेडसेट सादर केले आहेत. २८ तासांचा अखंडित गेमप्ले यातून मिळू शकतो आणि त्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या पीसी गेम्स वापरकर्त्यांना आरामात खेळता येतात. ‘फॅनेटिक’ या प्रसिद्ध इस्पोर्ट्स टीमच्या सहकार्याने ‘इनझोन एच-फाइव्ह वायरलेस हेडसेट’ विकसीत करण्यात आले आहेत.

अचूक-अभियांत्रिकीतून निर्माण होणारा ३६० अंश कोनांतून उमटणारा अवकाशीय आवाज हे या हेडसेटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ‘इनझोन एच-फाइव्ह वायरलेस गेमिंग हेडसेट’मधून ‘थ्री-डी साउंड पोझिशनिंग’चा आनंद मिळतो. या हेडसेटचे वजन केवळ २६० ग्रॅम असून ‘सॉफ्ट-फिट इअर पॅड’ व ‘लो-प्रेशर डिझाईन’ यांमुळे ‘इनझोन एच-फाइव्ह हेडसेट’ हा दीर्घकाळ चालणाऱ्या गेमिंग सत्रांमध्येही आरामदायी ठरतो. पार्श्वभूमीतील अनावश्यक आवाज व खरखर कमी करण्यासाठी यामध्ये एआय आधारित यंत्रणा वापरण्यात आली आहे. यातील ‘बाय -डायरेक्शनल मायक्रोफोन’मुळे स्पष्ट आवाजात संभाषणाचा आनंद घेता येतो.

‘इनझोन एच-फाइव्ह’च्या वायरलेस क्षमतेमुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय गेम खेळता येते व गेममधील एकही महत्त्वाचा क्षण चुकत नाही. यामध्ये यूएसबी डोंगलसह लो-लेटेंसी २.४ गिगाहर्ट्झ वायरलेस कनेक्शन दिल्यामुळे तुम्हाला २८ तासांपर्यंत केबलशिवाय मुक्तपणे गेम प्ले करता येतात.

अधिक उच्च पातळीचा आणि तितकाच खालच्या पातळीवरचा आवाज वितरीत करण्यासाठी, एक डायनॅमिक ऑडिओ अनुभव प्रदान करण्यासाठी ‘इनझोन एच-फाइव्ह’ हा हेडसेट तयार केला गेला आहे. तो तुम्हाला गेममध्ये मग्न करतो. ‘इनझोन एच-फाइव्ह हेडसेट’ येत्या दि. ३० नोव्हेंबरपासून भारतातील सोनी रिटेल स्टोअर्स (सोनी सेंटर व सोनी एक्स्क्लुझिव्ह), www.ShopatSC.com हे पोर्टल, इतर प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट्स येथे उपलब्ध असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading