Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पुणे  :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष* अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार दिप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘समतेचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाला घरातूनच सुरूवात केली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवल्यामुळे महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी झाली आणि आज सर्व क्षेत्रात महिला समर्थपणे काम करीत आहेत. महात्मा फुलेंचे विचार काँग्रेस पक्षाने पुढे चालू ठेवल्याने मुलींच्या शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. मुली अर्थाजन करू लागल्या. शिक्षणामुळे आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जात-धर्म कधीही मानला नाही. सामाजिक क्रांतीची लाट त्यांनी आणली. स्त्री – पुरूष समानता ही सामाजिक चळवळ त्यांनी सुरू केली. त्यांची प्रेरणा आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढे जाऊया.’’

 

शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘अज्ञानातून सज्ञानाकडे महाराष्ट्रातील माणसे वळाली किंवा शिक्षण घेऊ लागली ती केवळ महात्मा ज्योतिबांमुळेच. दलितांना माणसांनी माणसांप्रमाणे वागवावे म्हणून त्यांनी स्वत:च्या हौदातील पाणी देण्याची सोय केली. दलित शब्दाची ओळख त्यांनीच आपल्याला करून दिली. वाट चूकलेल्या महिलांची बाळंतपण करून त्या मुलांना सांभाळण्याची सोय पुण्यातच केली. लोकांनी नाकारले, झिडकारले पण महात्मा फुलेंनी समाजसेवेचे व्रत सांभाळले. विधवांसाठी मदत केंद्र स्थापन केले. आपल्या पत्नीला शिकवून पहिल्या महिला शिक्षिका बनविले. स्त्रिया, मुली त्यामुळे भिडे वाड्यात येवून शिकू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात पहिला पोवाडा त्यांनी लिहिला. या महान समाजसुधारकास त्रिवार प्रणाम.’’ यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, दत्ता उभे, द. स. पोळेकर, रोहित लभडे विजय मोहिते, उषा राजगुरू, सुदंर ओव्‍हाळ, शारदा वीर, रेखा घेलोत, प्रथमेश लभडे, फिरोज शेख, राज घेलोत, मुन्ना खंडेलवाल, चंद्रकांत नर्वेकर, नाना भगडे, हरिदास अडसूळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार खडकीचे सेल्वराज ॲन्थोनी यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading