दीपावली निमित्त कसबा भाजपचा दिवाळी फराळ आणि स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम संपन्न !
पुणे : दीपावलीच्या सणानिमित्त कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या तर्फे आयोजित भाजपाचा दिवाळी फराळ आणि स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नू.म.वि. प्रशाला पुणे येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप महाराष्ट्र सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे शहरातील भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष, योगेश टिळेकर, पुण्याचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस नेते अंकुश काकडे, योगेश गोगावले, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील, पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आदि पदाधिकारी, पोलीस सहकारी उपस्थित होते. सोबतच सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सहकार, वैद्यकीय, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गणेश मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “दीपावली हा एक आनंदोत्सव आहे. या सणानिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकमेकांना भेटू शकतो आणि आपला सलोखा वाढवू शकतो. हेमंतजी रासने यांनी पोटनवडणुकीतील पराभवाने न खचता पुन्हा नवीन जोशाने कार्याला सुरुवात केली असून आता कसबा मतदासंघांतील नागरीकांच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. आणि यावेळेस नक्कीच ते सर्वाधिक मतांनी निवडून येतील हा मला विश्वास आहे.”
दरम्यान, बावनकुळे यांनी या कसबा मतदारसंघातील नागरिकांना रासने यांनी अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे दर्शन घडवावे अशी सूचना केली. यानंतर राम जन्मभूमीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रयत्नातून साकारण्यात येणारे ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी आपल्या ५००० पेक्षा अधिक नागरिकांना,प्रमुख पदाधिकाऱ्यांना अयोध्येत नक्की घेऊन जाईल आणि चंद्रशेखर बावनकुळे याना दिलेला शब्द मी नक्कीच पूर्ण करेन असा शब्द हेमंत रासने यांनी दिला.
यावेळी पुणे शहरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सहकार, वैद्यकीय, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, पोलीस सहकारी, व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. तसेच, एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
