रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचे रांगोळीतून स्मरण
पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, पुणे शहर पोलिस, पुणे शहर वाहतूक पोलिस, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना व महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जगामध्ये रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचा स्मरण दिनाचे औचित्य साधून कात्रज येथील राजीव गांधी उद्यान येथे रांगोळी द्वारे संदेश देण्याचा उपक्रम राबविण्यात आला, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सचिन सावदेकर यांनी मेणबत्ती लावून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली तसेच वाहतूक नियमांचे पालन कशा पद्धतीने केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले, या कार्यक्रमात महेश ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक श्री शशांक शिळीमकर उपस्थित होते, महेश ड्रायव्हिंग स्कूल चे कर्मचारी वर्ग पांडुरंग ढेबे, सागर ढेबे, योगेश दिघे, श्रीशैल्य शिंगे, बसवराज कांबळे, सचिन देशमुख, कृष्णा कांबळे, उपस्थित होते, कार्यक्रमाची सांगता विनायक कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून केली