बागेश्वर धाम सरकार यांच्या श्री हनुमान कथा व महादिव्य दरबारचे आयोजन!
जगदीश मुळीक फाऊंडेशन तर्फे आयोजित देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंडित धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या मंत्रमुग्ध अमृतवाणीतून ‘हनुमान कथा सत्संग’ आणि ‘दिव्य दरबार’ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
संगमवाडी येथे या भव्य दरबाराचे आयोजन सोमवार, दि. २० नोव्हेंबर ते बुधवार दि. २२ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. धार्मिकतेला अध्यात्माची जोड देण्यात हातखंडा असलेले बागेश्वर महाराज प्रथमच पुण्यनगरीत येत असून त्यांच्या दुर्मिळ अशा अमृतवाणीचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा पुणे शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले आहे.
सत्संग कार्यक्रम खालील प्रमाणे नियोजन आहे.
सोमवार दिनांक २० नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजता- ‘हनुमान कथा सत्संग’
मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता – ‘दिव्य दरबार’
सायंकाळी ४ वाजता – ‘हनुमान कथा सत्संग’
बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजता- ‘हनुमान कथा सत्संग’