fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsSports

एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत आर्य पाटकर, अद्वैत गुंड, अभिरसिंग सिद्धू, विहान कंगतानी यांचे विजय 

पुणे :  नवसह्याद्री क्रीडा संकूल व शेपींग चॅम्पियन्स यांच्या संलग्नतेने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए –  नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आर्य पाटकर, अद्वैत गुंड, अभिरसिंग सिद्धू, विहान कंगतानी यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला. 
 
नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत चुरशीच्या लढतीत आर्य पाटकरने चौथ्या आर्यन बॅनर्जीचा टायब्रेकमध्ये 9-8(5) असा पराभव केला. अभिरसिंग सिद्धूने पाचव्या मानांकित हर्ष परिहारचा 9-7 असा तर, अद्वैत गुंडने अकराव्या मानांकित अभिनव महामुनीचा 9-4 असा पराभव करून अंतिम पात्रता फेरी गाठली. विहान कंगतानीने सहाव्या मानांकित शौर्य गडदेला 9-6 असे पराभूत केले. अव्वल मानांकित स्मित उंडरेने अध्याय कालेकरचा 9-0 असा सहज पराभव केला. 


निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
स्मित उंडरे(1)वि.वि.अध्याय कालेकर 9-0;
इशान साटम वि.वि.लव परदेशी 9-4;
वैष्णव रानवडे(2)वि.वि.ईश्वरराज होमकर 9-1;
रिशान गुंडेचा(15)वि.वि.अद्वैत मुधोळकर 9-1;
भार्गव वैद्य(3)वि.वि.साक्ष बुधनी 9-5;
रोहन बोर्डे(12)वि.वि.सुजित कीर्तन 9-7;
आर्य पाटकर वि.वि.आर्यन बॅनर्जी(4) 9-8(5);
अद्वैत गुंडवि.वि.अभिनव महामुनी(11) 9-4;
अभिरसिंग सिद्धू वि.वि.हर्ष परिहार(5) 9-7;
अमोघ पाटील(9)वि.वि.विवान मल्होत्रा 9-3;
विहान कंगतानी वि.वि.शौर्य गडदे(6) 9-6;
अनिश वडनेरकर(7)वि.वि.जतीन भोरटके 9-4.

Leave a Reply

%d